1 / 9श्रावणी सोमवारचे व्रत घरोघरी मोठ्या आनंदाने केले जाते. महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. आता अशा शुभप्रसंगी दारासमोर तर रांगोळी हवीच...2 / 9आता प्रत्येक व्रताला, सण- समारंभांना थीमनुसार रांगोळी काढता येते. त्यामुळेच श्रावणी सोमवारसाठीही तुम्ही अशा प्रकारच्या काही रांगोळ्या काढू शकता.3 / 9या रांगोळी काढायला अगदी सोप्या असून त्यासाठी वेळही कमी लागतो.4 / 9ही एक छान रांगोळी पाहा. हल्ली फ्लॅट संस्कृतीमुळे घरासमोरची जागा छोटी असते. त्यामुळे कमी जागेत रांगोळी काढण्यासाठी हे डिझाईन्स छान आहेत.5 / 9फुलांचा वापर करून या रांगोळीला थ्री- डी इफेक्ट देण्यात आला आहे. थोडा निवांत वेळ असेल तर असे काही डिझाईन्स ट्राय करून पाहू शकता.6 / 9अशी काही वेगळी रांगोळी काढली तर सगळेच तुमचं कौतूक करतील.7 / 9श्रावणी सोमवारची पूजा जिथे मांडणार आहात, त्याच्यासमोर तुम्ही या पद्धतीने रांगोळी काढून सजावट करू शकता. 8 / 9तांदूळ, हळद- कुंकू यांचा वापर करून तयार करण्यात आलेली शंकराची ही एक सुंदर पिंड. 9 / 9नेहमीच्या त्याच त्या रांगोळ्या काढण्यापेक्षा अशा पद्धतीच्या थोड्या वेगळ्या रांगोळ्या काढल्या तर नक्कीच सणाचा आनंद जास्त वाढतो..