1 / 6मंगळागौरीची पूजा झाल्यानंतर सायंकाळी हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात येतो. त्यावेळी मंगळागौरीच्या पुजेची सजावट कशी करावी, यासाठी या काही खास टिप्स..2 / 6पांढऱ्या कपड्याचा वापर करून अशा पद्धतीने हिमालय पर्वताचा वापर करून तुम्ही मंगळागौरीची सजावट करू शकता.3 / 6पांढरा कपडा तुमच्याकडे नसेल तर कापसाचा वापर करूनही हिमालयाचा खूप छान देखावा करता येतो. 4 / 6चाफ्याची पानं वापरून अशा पद्धतीने खूप छान नागाचा फणा तयार करता येतो. 5 / 6महादेवाच्या पिंडीजवळ नाग असायलाच हवा. छानसा भव्य नाग घरच्याघरी तयार करून महादेवाच्या पिंडीमागे सजवा. खूप वेगळा देखावा होईल.6 / 6तुमच्याकडे इतर कोणतेच साहित्य नसेल तर फक्त झेंडू आणि शेवंती किंवा गुलाबाच्या पाकळ्या वापरूनही तुम्ही खूप उत्तमप्रकारे मंगळागौरीची सजावट करू शकता.