मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

Updated:February 12, 2025 17:13 IST2025-02-12T17:07:06+5:302025-02-12T17:13:47+5:30

see how you should behave in platonic friendship: मित्रांनी मैत्रीच्या या मर्यादा कधीच ओलांडू नयेत.

मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

'एक लडका और लडकी कभी दोस्त नही हो सकते' हा डायलॉग तर फारच फेमस आहे. पण मग हे सत्य आहे का? तर नाही. मैत्री जेंडर बघून केली जात नाही. ती अशीच होऊन जाते. पण मुलांची मैत्री आणि मुला-मुलींची मैत्री वेगळी असते हे मात्र खरं आहे.

मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

एका मित्राने आपल्या मैत्रिणीशी कसे वागावे याला काही मर्यादा असल्याच पाहिजेत. त्या राखल्यावरच त्या मैत्रीला 'प्लेटोनिक' मैत्री म्हणता येईल. नाही तर त्या मैत्रीत मैत्रीचे पावित्र्य उरणार नाही.

मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

मित्रांनी आपल्या मैत्रिणींबरोबर असताना काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या. या सात बाबतीत मुलांनी मर्यादा राखावी. ती राखली जात आहे का? हे पाहणे मुलींची जबाबदारी आहे.

मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

बरेचदा मुलाच्या मनात मुलीसाठी मैत्री पलिकडे भावना निर्माण होतात. त्याबद्दल ते बोलत नाहीत. पण मुलीच्या अवतीभवतीचे त्यांचे वागणे बदलते. त्याचे कारण न कळल्याने मुलींना अनकम्फर्टेबल वाटायला लागते. त्यापेक्षा आधीच स्पष्ट बोलून घ्या. मैत्रीत तुमची भूमिका काय आहे ते जाणून घ्या. एकमेकांच्या भावनांचा आदर ठेवा.

मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

मैत्रीत टाळी देणं, मिठी मारणं सहाजिक आहे. पण त्यामागील भावना महत्त्वाची. शारीरिक स्पर्शाला मर्यादा हव्यात. समोरच्याचा स्पर्श चांगला का वाईट ते मुलींना कळते. त्याबद्दल मित्रांशी बोला. तुम्हाला जर त्यांचा स्पर्श निष्कारण वाटत असेल तर त्यांना सांगा.

मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

संवाद साधताना मस्करीत मुलगा पटकन असं काही बोलत असेल जे तुम्हाला आवडत नाही तर, तो संवाद थांबवा. मज्जा मस्ती असली तरी, काही विषय असतात जे मुलींना बोलायला आवडत नाहीत. याचे भान मुलांनी ठेवावे.

मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

बरेचदा मैत्रिणीमुळे मित्राच्या लव्ह रिलेशनशिपमध्ये अडथळे येतात. तसेच मित्राचे वागणे मैत्रिणीच्या प्रियकराला आवडत नाही. त्यामुळे वागण्यात मर्यादा हवी. एकमेकांच्या रिलेशनशीपमध्ये सतत नाक खुपसू नये. कितीही खास मित्र असला किंवा मैत्रिण असली तरी तो अधिकार त्यांना नसतो. वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नये.

मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

आजकालचा जमाना सोशल मिडियाचा आहे. वेगवेगळ्या अॅप्स वरून आपण गप्पा मारत असतो. पण त्यावरही मर्यादा हवी. असं मानसशास्त्रीय अभ्यासातून सिद्ध झाले आहे. सतत चॅट करणे त्या मैत्रीला वेगळ्या मार्गाला नेते.

मुलींशी मैत्री करताना मुलांचं काय चुकतं आणि तुटते मैत्री? कधीच विसरु नका ७ गोष्टी

एकत्र जेवायला जाणं, चित्रपटाला जाणं, फिरायला जाणं नक्कीच चांगलं आहे. पण कायम तुम्ही दोघंच जाता का? तिसरा माणूस तुम्हाला नको वाटतो. तर त्याला आत्ताच्या भाषेनुसार डेट म्हणता येईल. मैत्रीच्या पुढे तुम्ही गेले असण्याची शक्यता आहे.