Join us   

Ranbir- Alia wedding: आलिया- रणबीरचा सुंदर जोडा, लग्न सोहळ्याचे देखणे- रोमँटिक फोटो..आलिया दिसतेय विलक्षण सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 8:14 PM

1 / 7
१. काल मेंहंदी प्रोग्राम झाला तेव्हापासून रणबीर- आलिया (Ranbir- Alia) यांची झलक दिसलेली नव्हती.. त्यामुळे ते लग्नात नेमके कसे दिसत आहेत, ड्रेसिंग आणि ज्वेलरी काय, याबाबत त्यांच्या चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सूकता दिसत होती...
2 / 7
२. लग्न लागल्यानंतरही वऱ्हाडींची झलक दिसत होती, पण नवरा- नवरीचे दर्शन मात्र होत नव्हते..
3 / 7
३. अखेर आलियानेच ही कोंडी फोडली.. तिने नुकतेच तिचे आणि रणबीरचे लग्नातले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून अवघ्या काही मिनिटांतच या नवदाम्पत्याचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
4 / 7
४. ना खूप भरगच्च लेहेंगा, ना हेवी ज्वेलरी आणि ना कोणताही भडक मेकअप.. तरीही आलिया रणबीरची दुल्हन म्हणून खुपच सुंदर दिसत होती.. साधेपणातही किती सौंदर्य आहे, हे आलियाकडे बघून समजत होते.. तिचा लेहेंगा सोनेरी, बेबीपिंक शेडमधला तिचा लेहेंगा डिझायनर सब्यासाची यांनी डिझाईन केला हाेता.
5 / 7
५. रणबीरचा लूकही सिंपल आणि क्लासी होता. मोतिया आणि गोल्डन रंगाचे त्याचे कपडे, गळ्यात मोत्याचा कंठा आणि ऐटबाज फेटा असा रणबीरचा लूक होता.
6 / 7
६. त्यांचे लग्नातले हार देखील अतिशय वेगळे होते. सामान्यपणे लाल- पांढऱ्या फुलांनी लग्नाची वरमाला तयार केली जाते. पण रणबीर- आलियाच्या लग्नातले हार मात्र पांढऱ्या आणि हिरव्या रंगात गुंफण्यात आले होते.
7 / 7
७. we can’t wait to build more memories together … memories that are full of love, laughter, comfortable silences, movie nights, silly fights, wine delights and Chinese bites...अशी इमोशनल कॅप्शन टाकून आलियाने लग्नाचा आनंद व्यक्त केला आहे.
टॅग्स : रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठरणबीर कपूरआलिया भटलग्न