1 / 7१. प्रत्येक घरात प्लास्टिकच्या अनेक वस्तू असतात. घरात होणारे लहान- सहान कार्यक्रम, गेटटुगेदर आजकाल युज ॲण्ड थ्रो वस्तूंच्या जीवावरच पार पाडले जातात. पण प्लास्टिकचा हा वापर आता पर्यावरणासाठी धोक्याची मर्यादा ओलांडणारा ठरला आहे.2 / 7२. त्यामुळेच तर केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने सिंगल युज प्लास्टिकवर म्हणजेच युज ॲण्ड थ्रो प्रकारात मोडणाऱ्या वस्तूंवर कडक नियम घातले आहेत. त्यानुसार आता देशभरातच याविषयी एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला असून सिंगल युज प्रकारात मोडणाऱ्या अनेक वस्तूंवर १ जुलैपासून बंदी घालण्यात आली आहे.3 / 7३. बंदी असणाऱ्या वस्तू विकताना, खरेदी करताना किंवा वापरताना आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून सांगण्यात आले.4 / 7४. त्यानुसार आता १ जुलैपासून पुढील काही वस्तूंवर बंदी येणार आहे. याचा सगळ्यात मोठा फटका बसणार आहे तो आपल्या घरात सेलिब्रेशनसाठी वापरात येणाऱ्या युज ॲण्ड थ्रो प्लॅस्टिक वस्तूंवर. प्लॅस्टिकच्या प्लेट, वाट्या, ग्लास, चमचे या सगळ्या वस्तू १ जुलैपासून बंद होतील.5 / 7५. प्लास्टिक इयर बड्स, फुग्यांच्या प्लास्टिक स्टिक, आइस्क्रिम स्टिक या सगळ्या गोष्टी वापरण्याची सवय आता बंद करावी लागेल. अर्थात यासाठी लवकरच काही पर्यायी व्यवस्था करण्यात येतील.6 / 7६. प्लास्टिक फ्लॅग, पॅकींगचे प्लास्टिकचे सामान, पीव्हीसी बॅनर यासगळ्या गोष्टीही बॅन करण्यात आल्या आहेत.7 / 7७. बंदी घालण्यात आलेल्या वस्तूंमध्ये सिगारेट पाकिटांचा तसेच प्लास्टिकच्या इन्व्हिटेशन कार्डचाही समावेश आहे.