Navratri 2025 : नवरात्रीच्या ९ दिवसांत काढा सोप्या, सुबक रांगोळ्या; 9 डिजाईन्स- ५ मिनिटांत होईल रांगोळी
Updated:September 15, 2025 15:39 IST2025-09-15T15:21:25+5:302025-09-15T15:39:28+5:30
Navratri 2025 : हॅप्पी नवरात्री, नवरात्रीच्या शुभेच्छा, जय भवानी-जय अंबे असा मेसेज लिहूनही रांगोळी काढता येईल.

नवरात्रीच्या (Navratri 2025) नऊ दिवसांत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. नवरात्रीला अनेक घरांमध्ये घट बसवले जातात तर काही ठिकाणी देवीच्या मुर्तीची स्थापना केली जाते.(Navratri Rangoli Designs 9 Easy Simple Rangoli Designs)
देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही सोप्या रांगोळ्या काढू शकता. या रांगोळी डिजाईन्स तुम्हाला अगदी कमीत कमी वेळात काढता येतील.(Navratri Rangoli Designs)
नऊ दिवसांच्या रांगोळीत तुम्ही देवीची विविध रूप काढू शकता, दुर्गा, कालिका माता अश्या छोट्या प्रतिमा रांगोळीत काढू शकता.
हॅप्पी नवरात्री, नवरात्रीच्या शुभेच्छा,जय भवानी-जय अंबे असा मेसेज लिहूनही रांगोळी काढता येईल.
जर तुम्ही रोज नवीन रांगोळी काढणार असाल तर ज्या दिवशी जो रंग आहे तशा रंगाची रांगोळी काढा.
या रांगोळीत तुम्ही देवीची विविध आभुषणे, वस्त्र, शस्त्र यांची रांगोळी काढू शकता.
विशेष म्हणजे नवरात्रीच्या रांगोळीत तुम्ही सगळ्या रंगांचा वापर करू शकता.
या रांगोळीत तुम्ही पानं, फुलांचा वापरही करू शकता.
देवीच्या पाऊलांचे ठसे सुद्धा ५ मिनिटांत काढून होतील.
या रांगोळ्यांभोवती दिवे ठेवून तुम्ही सुंदर सजावट करू शकता.