1 / 7पावसाळा सुरु होण्यापूर्वीच वातावरण काही प्रमाणात दमट होते. वातावरणातील आर्द्रतेमुळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही पदार्थांना ओलावा सुटू लागतो. 2 / 7पावसाळ्यात साखर- मीठ सारख्या पदार्थांना ओलावा सुटतो. डबा किती पॅकबंद केला तरी मुंग्या लागतात. अशावेळी नेमके काय करावे सुचत नाही. 3 / 7पावसामुळे घरात ओलावा निर्माण होतो. त्यामुळे जमिनीतून किंवा भिंती ओल्या होतात. अशावेळी पदार्थ सादळतात. आपल्यासोबतही असेच काहीसे होत असेल तर ४ सोपे उपाय लगेच करा. 4 / 7पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी ६ ते ७ लवंग साखरेच्या डब्यात कापडात बांधून ठेवा. असे केल्याने साखर खराब होणार नाही. 5 / 7पावसाळा सुरु होण्यापूर्वी काचेच्या भांड्यात साखर साठवायला सुरुवात करा. तसेच साखर वापरताना हात आणि चमचा नेहमी कोरडा असायला हवा. 6 / 7कोणत्याही भांड्यात साखर किंवा मीठ भरण्यापूर्वी त्यात कापडात बांधलेले तांदळाचे दाणे घाला. असे केल्याने पदार्थांमध्ये तयार होणार अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यास मदत होईल. 7 / 7ज्या भांड्यात साखर - मीठ ठेवणार असाल तर त्यामध्ये दालचिनीचे काही तुकडे घाला. असे केल्याने साखर आणि मीठ सादळणार नाही. तसेच पदार्थांची चव देखील टिकून राहिल.