Join us   

कोण आहे ३१ सुंदरींना मागे टाकणारी मिस इंडिया विजेती सिनी? असा होता मिस इंडिया होण्याचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 6:44 PM

1 / 8
'मिस इंडिया 2022'ची विजेती (Miss India Winner 2022) कर्नाटकची सिनी शेट्टी आहे. मिस इंडिया आणि वर्ल्ड 2020 मानसा वाराणसीने सिनीला विजेतीचा मुकुट दिला. सिनी ही टॉप 5 फायनलिस्टपैकी एक होती. तिने रुबल शेखावत, शिनाता चौहान, प्रज्ञा अय्यागरी आणि गार्गी नंदी यांचा पराभव केला. (Femina Miss India Winner 2022)
2 / 8
यावेळी मिस इंडियाच्या शर्यतीत 31 सुंदरींमध्ये चुरशीची स्पर्धा होती. त्यांना मागे टाकत सिनी शेट्टीने मिस इंडिया स्पर्धा जिंकली. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे मिस इंडिया २०२२ ची विजेती सिनी शेट्टी. (Who is sini shetty femina miss india world winner 2022)
3 / 8
मिस इंडिया 2022 ची विजेती ठरलेली सिनी शेट्टी 21 वर्षांची आहे. सिनी शेट्टीचा जन्म मुंबईत झाला, पण ती कर्नाटकची रहिवासी आहे. तिनं अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. याशिवाय ती CFA (चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट) करत आहे.
4 / 8
मिस इंडियाचा ताज जिंकलेली सिनी शेट्टी केवळ अभ्यासातच हुशार नाही तर ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे. त्यांनी वयाच्या 4 व्या वर्षी नृत्य करण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी स्टेजवर सादरीकरण केले. मिस इंडिया 2022 च्या विजेतेपदापूर्वी तिने एक स्पर्धांमध्ये मिस टॅलेंट पुरस्कार जिंकला आहे.
5 / 8
मिस इंडिया 2022 चे विजेतेपद कर्नाटकच्या सिनी शेट्टीकडे गेले, तर राजस्थानच्या रुबल शेखावतला प्रथम उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. तर उत्तर प्रदेशातील शिनाता चौहान मिस इंडिया 2022 ची सेकंड रनर अप होती.
6 / 8
सिनी शेट्टीने ETimes शी बोलताना तिच्या आयुष्याचा उद्देशही सांगितला. ती म्हणाली, 'तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सरळ उडी मारू शकत नाही. प्रवास हा सर्वात सुंदर भाग आहे. प्रत्येक स्त्रीने 'बळकट, मेहनती आणि दयाळू' होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.''
7 / 8
सिनी शेट्टी मिस इंडिया 2022 चा खिताब जिंकल्यानंतर ती आता 71 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
8 / 8
(Image credit- Instagram @sinishettyy, Instagram @missindiaorg)
टॅग्स : सोशल व्हायरलमिस इंडिया