एक दिवसाचं बाळ सोडून पत्नी गेली! राजपाल यादवची अनोखी लव्हस्टोरी आणि जगण्याचा संघर्ष

Updated:February 12, 2026 16:57 IST2026-02-12T16:36:15+5:302026-02-12T16:57:56+5:30

एक दिवसाचं बाळ सोडून पत्नी गेली! राजपाल यादवची अनोखी लव्हस्टोरी आणि जगण्याचा संघर्ष

राजपाल यादव. अत्यंत गुणी अभिनेता. पण ९ कोटींच्या चेक बाऊंस प्रकरणात अडकला आणि पैसे नसल्याने त्यानं समर्पण केलं. सध्या तो गजाआड आहे. लोक मदतीला धावले असले तरी राजपालचं एकुणच आजवरचं जगणं संघर्षच आहे..

एक दिवसाचं बाळ सोडून पत्नी गेली! राजपाल यादवची अनोखी लव्हस्टोरी आणि जगण्याचा संघर्ष

आयुष्यात अडचणी येणं हे राजपाल यादवसाठी नवं नाहीच. सतत काही ना काही वादळं त्याच्या आयुष्यात घाेंगावत असतात. मग ते आता आलेलं आर्थिक वादळ असो किंवा मग काही वर्षांपूर्वी झालेला मानसिक आघात असो...

एक दिवसाचं बाळ सोडून पत्नी गेली! राजपाल यादवची अनोखी लव्हस्टोरी आणि जगण्याचा संघर्ष

अवघ्या विसाव्या वर्षी त्याचं लग्न झालं. त्यावेळी तो एका कपड्याच्या कंपनीमध्ये नोकरी करत होता. १९९१ साली त्याला पहिली मुलगी झाली. कुटूंबात आनंद आला. पण त्या बाळंतपणातच त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. एकीकडे पत्नी गेल्याचं दु:ख दुसरीकडे काही दिवसांची मुलगी हातात.

एक दिवसाचं बाळ सोडून पत्नी गेली! राजपाल यादवची अनोखी लव्हस्टोरी आणि जगण्याचा संघर्ष

त्यानंतर मुलीची जबाबदारी आईकडे आणि बायकोच्या बहिणीकडे सोपवून त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला आणि लक्ष करिअरवर दिलं. तिथून बाहेर पडल्यानंतरही खूप नकार पचवले. मार्ग कठीणच दिसत होता. सगळीकडून नकारघंटा येत होत्या आणि त्यानंतर मग २००० साली आलेल्या 'जंगल'मधून त्याला चांगला ब्रेक मिळाला.

एक दिवसाचं बाळ सोडून पत्नी गेली! राजपाल यादवची अनोखी लव्हस्टोरी आणि जगण्याचा संघर्ष

यानंतर २००१ साली 'द हिरो' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान त्याला राधा भेटली. तेव्हा ती कॅनडाला राहायची. दोघे एकमेकांशी नेहमीच बोलायचे. मग एक दिवस त्याने तिला प्रपोज केलं आणि तिनेही फक्त “Are you sure?” एवढंच विचारून खातरजमा करून घेतली.

एक दिवसाचं बाळ सोडून पत्नी गेली! राजपाल यादवची अनोखी लव्हस्टोरी आणि जगण्याचा संघर्ष

२००३ साली त्यांचं लग्न झालं. त्यानंतर ज्या पद्धतीने राधाने त्याची संस्कृती, त्याचं कुटूंब, त्याचं खेडेगावातलं आयुष्य स्वीकारुन स्वत:ला ॲडजस्ट करून घेतलं आणि त्याच्याा मोठ्या मुलीची प्रेमाने जबाबदारी घेतली ते पाहून तो तिच्या अधिकच प्रेमात पडला आणि तिच्याविषयी त्याला मनोमन खूप आदरही वाटला.

एक दिवसाचं बाळ सोडून पत्नी गेली! राजपाल यादवची अनोखी लव्हस्टोरी आणि जगण्याचा संघर्ष

राजपालने मुलाखतीतूनही कित्येकदा सांगितलं आहे की त्यांनी कधीच तिच्यावर कोणती जबाबदारी किंवा बंधनं टाकली नाहीत. तिने स्वत:हून सगळं केलं. तो म्हणतो जगात कित्येक लव्हस्टोरी आहेत. पण मी जेव्हा माझ्या खऱ्याखुऱ्या स्टोरीचा विचार करतो तेव्हा मला खरंच छान वाटतं आणि राधाचा खूप अभिमान वाटतो..

एक दिवसाचं बाळ सोडून पत्नी गेली! राजपाल यादवची अनोखी लव्हस्टोरी आणि जगण्याचा संघर्ष

राजपाल आणि राधाचा संसार सुखाचा चालू असताना त्याने एका चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज घेतलं आणि पुन्हा त्याच्या मागचं दुष्टचक्र सुरू झालं. लोकांना पोट धरून हसविणारा हा अभिनेता आता या घडीला तरी स्वत:च्या आयुष्यातलं हसू गमावून बसला आहे.