कुकरची शिट्टी सतत खराब होते? ८ टिप्स, कुकर चांगला राहील-कुकरचा स्फोट टळेल

Updated:February 26, 2026 08:10 IST2026-02-26T08:09:00+5:302026-02-26T08:10:02+5:30

Life Hacks Pressure Cooker Whistle Repair Tricks Cooker Hacks

कुकरची शिट्टी सतत खराब होते? ८ टिप्स, कुकर चांगला राहील-कुकरचा स्फोट टळेल

कुकरची शिट्टी वारंवार खराब होणं ही खूपच त्रासदायक गोष्ट आहे. पण योग्य काळजी घेतल्यास तुम्ही हा त्रास नक्कीच कमी करू शकता. कुकरची शिट्टी आणि व्हॉल्ह सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स लक्षात घ्यायला हव्यात. (Life Hacks Pressure Cooker Whistle Repair Tricks Cooker)

कुकरची शिट्टी सतत खराब होते? ८ टिप्स, कुकर चांगला राहील-कुकरचा स्फोट टळेल

शिट्टीच्या नळीत किंवा व्हॉल्व्हमध्ये अन्नाचे कण अडकल्यामुळे वाफ नीट बाहेर पडत नाही आणि दबाव वाढतो. प्रत्येक वापरा नंतर शिट्टी आणि कुकरचे झाकण नीट स्वच्छ करा.

कुकरची शिट्टी सतत खराब होते? ८ टिप्स, कुकर चांगला राहील-कुकरचा स्फोट टळेल

अधूनमधून शिट्टीच्या आतील छिद्र टुथपिकनं किंवा एखाद्या बारीक तारेनं साफ करा. जेणेकरून तिथे कचरा साचणार नाही.

कुकरची शिट्टी सतत खराब होते? ८ टिप्स, कुकर चांगला राहील-कुकरचा स्फोट टळेल

कुकरमध्ये पुरेसं पाणी नसेल तर अन्न खाली जळू शकतं आणि त्याचा चिकटपणा किंवा वाफ वाटेत अडकून शिट्टी खराब होऊ शकते. नेहमी गरजेपेक्षा थोडं जास्त पाणी वापरा.

कुकरची शिट्टी सतत खराब होते? ८ टिप्स, कुकर चांगला राहील-कुकरचा स्फोट टळेल

जर कुकरच्या झाकणाचे रबर जुनं किंवा सैल झालं असेल तर वाफ बाहेरच्या बाजूनं गळते. यामुळे शिट्टीवर जास्त ताण येतो. गॅस्केट दर ६ ते १३ महिन्यांनी बदलणं गरजेचं आहे.

कुकरची शिट्टी सतत खराब होते? ८ टिप्स, कुकर चांगला राहील-कुकरचा स्फोट टळेल

कुकरमध्ये खूप जास्त अन्न भरल्यास वरच्या बाजूला जागा उरत नाही आणि शिट्टीच्या छिद्रातून रस्सा किंवा अन्नाचे कण वर येऊन शिट्टी जॅम होते. कुकर नेहमी त्याच्या क्षमतेच्या जास्त भरू नका.

कुकरची शिट्टी सतत खराब होते? ८ टिप्स, कुकर चांगला राहील-कुकरचा स्फोट टळेल

अनेकदा आपण स्वस्त किंवा ड्युपलिकेट शिट्टी घेतो जी लवकर खराब होते. नेहमी कुरकच्या कंपनीची अधिकृत शिट्टीच वापरा.

कुकरची शिट्टी सतत खराब होते? ८ टिप्स, कुकर चांगला राहील-कुकरचा स्फोट टळेल

शिट्टी बराचवेळ पाण्यात किंवा साबणाच्या पाण्यात भिजत ठेवू नका. यामुळे आतील स्प्रिंग खराब होते.