Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फेकण्याची चूक करू नका! जितक्या जुन्या तितक्याच मौल्यवान; स्वयंपाकघरातील 'या' ५ वस्तूंना नसते एक्सपायरी डेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2026 17:34 IST

1 / 7
स्वयंपाकघर आवरताना आपण अनेकदा हे खूप जुनं झालंय असं समजून काही गोष्टी थेट कचऱ्यात टाकतो. पदार्थांकडे पाहताना एक्सपायरी डेटचा गैरसमज होतो. मात्र काही गोष्टी अशा आहेत, ज्या योग्य पद्धतीने साठवल्यास वर्षानुवर्ष खराब होत नाहीत.(kitchen items with no expiry date)
2 / 7
विज्ञानानुसार आणि आयुर्वेदानुसार, आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्यांना 'एक्सपायरी डेट' नसतेच. उलट या वस्तू जितक्या जुन्या होतात, तितके त्यांचे गुणधर्म आणि चव अधिक वाढते. या ५ गोष्टी नेमक्या कोणत्या आणि त्या का फेकू नयेत, हे जाणून घेऊया.(foods that never expire)
3 / 7
मध हा जगातील एकमेव असा पदार्थ आहे जो हजारो वर्ष टिकू शकतो. मधात ओलावा कमी असतो आणि त्याची आम्लता जास्त असते. मध गोठले असले किंवा त्याचे खडे झाले असतील तर खराब झाले म्हणून फेकू नका. कोमट पाण्यात बाटली ठेवल्यास पुन्हा मध चाखता येईल.
4 / 7
साजूक तुपाला स्वयंपाकघरात अधिक महत्त्व आहे. काचेच्या बरणीत किंवा ओलाव्यापासून लांब ठेवल्यास ते वर्षानुवर्ष खराब होत नाही. जितके जुने तूप तितके पचनासाठी हलके असते.
5 / 7
तांदूळ हा जितका जुना असेल तितकी त्याची चव वाढते. यामुळे त्यातील पोषण देखील टिकून राहते. फक्त त्यात ओलावा किंवा कीड लागणार नाही याची काळजी घ्या.
6 / 7
मीठ आणि साखर हे कधीच खराब होत नाही. फक्त त्यांना ओलाव्याच्या ठिकाणी ठेवू नका. मीठाचा वापर इतर पदार्थ टिकवण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. यावर काळी बुरशी येत नाही तोपर्यंत त्या फेकण्याची गरज नसते.
7 / 7
मसूर, चणा किंवा इतर कडधान्ये पूर्णपणे वाळवली तर ती वर्षानुवर्ष टिकतात. जुन्या डाळी शिजायला थोडा जास्त वेळ घेतात किंवा चव देखील बदलते. पण आरोग्यासाठी हानिकारक नसतात. फक्त योग्य पद्धतीने साठवल्यास खाण्यास चांगल्या असतात.
टॅग्स : सोशल व्हायरलकिचन टिप्स