1 / 7१. करवा चौथचा सीन मोठ्या पडद्यावर म्हणजेच चित्रपटात बघायला खूप छान वाटतो. चित्रपटांमध्ये भरजरी साड्या आणि सुंदर दागिने घालून नटून- थटून करवा चौथ साजऱ्या करणाऱ्या अभिनेत्री प्रत्यक्ष जीवनात करवा चौथ कशा पद्धतीने साजरी करतात, हे बघण्याची उत्सूकता त्यांच्या चाहत्यांमध्ये असतेच.. म्हणूनच या बघा बॉलीवूडच्या काही अभिनेत्री आणि त्यांचे खऱ्याखुऱ्या आयुष्यात साजरे झालेले करवा चौथचे काही क्षण.2 / 7२. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या लग्नानंतरची पहिली करवा चौथ अशा पद्धतीने ड्रेसिंग करून साजरी केली होती. पुर्ण पारंपरिक वेशभुषेत नटलेली ही जोडी अतिशय देखणी दिसत होती.3 / 7३. यामी गौतमीही यात अजिबातच मागे नव्हती. एखाद्या नवरीप्रमाणे नटून लाल रंगाचा भरजरी लेहेंगा घालून तिने करवा चौथ साजरी केली होती.4 / 7४. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मात्र तिच्या पहिल्या करवा चौथप्रसंगी अगदी साधा मेकअप आणि ड्रेसिंग केलं होतं. पिवळ्या रंगाची साडी आणि त्यावर शोभणारा हलकासा मेकअप अशा साध्या लूकमध्येही ऐश्वर्या अतिशय मोहक दिसत होती.5 / 7५. लग्नानंतरच्या पहिल्या करवा चौथला अभिनेत्री बिपाशा बसू हिनेही लाल रंगाची साडी नेसणे पसंत केले होते. त्यानंतर मात्र तिने अशा पद्धतीचा ड्रेस घालून साध्या पद्धतीने करवा चौथ साजरी केली.6 / 7६. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा मागच्या वर्षीचा हा करवा चौथ लूकही चांगलाच व्हायरल झाला होता. ट्रेण्डी आणि ट्रॅडिशनल अशा दोन्ही पद्धतीने ती नटली होती. 7 / 7७. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा हा लूकही बघण्यासारखा आहे. या पहिल्या करवाचौथनंतर तिनेही नंतरच्या काही करवा चौथला निळ्या किंवा वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसण्याला पसंती दिली होती.