Kangana Ranaut : कंगनाला मिळाला नवा पार्टनर? लग्न अन् मुलांच्या प्लॅनिंगबाबत स्वत: केला खुलासा

Published:November 11, 2021 04:40 PM2021-11-11T16:40:18+5:302021-11-11T16:52:01+5:30

Kangana Ranaut : नेहमीच आपले म्हणणे स्पष्टपणे मांडण्यासाठी ओळखली जाणारी कंगना तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते.

Kangana Ranaut : कंगनाला मिळाला नवा पार्टनर? लग्न अन् मुलांच्या प्लॅनिंगबाबत स्वत: केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तिच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती असल्याचा खुलासा तिनं स्वत: केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान कंगनाने सांगितले की, ती पुढील पाच वर्षांत स्वतःला विवाहित आणि मुलांसोबत पाहते.

Kangana Ranaut : कंगनाला मिळाला नवा पार्टनर? लग्न अन् मुलांच्या प्लॅनिंगबाबत स्वत: केला खुलासा

यावेळी तिनं आपल्या आयुष्यात कोणीतरी 'खास' व्यक्ती असल्याचे संकेत दिले. तिने चाहत्यांना वचन दिले आहे की ती लवकरच तिच्या भावी पतीबद्दल सर्वांना सांगेल.

Kangana Ranaut : कंगनाला मिळाला नवा पार्टनर? लग्न अन् मुलांच्या प्लॅनिंगबाबत स्वत: केला खुलासा

नेहमीच आपले म्हणणे स्पष्टपणे मांडण्यासाठी ओळखली जाणारी कंगना तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ती तिच्या स्पष्ट विचारांमुळे चर्चेत आली आहे. खरं तर टाईम्स नाऊ समिट (times now summit) दरम्यान कंगनाला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा तिच्या उत्तरांन सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.

Kangana Ranaut : कंगनाला मिळाला नवा पार्टनर? लग्न अन् मुलांच्या प्लॅनिंगबाबत स्वत: केला खुलासा

समिट दरम्यान कंगनाला विचारण्यात आले की, पुढील पाच वर्षांत तुम्ही स्वत:ला कसे पाहता? यावर कंगनाने प्रथम तिचे लग्न, बाळाचे नियोजन सांगितले, "मला निश्चितपणे लग्न करायचे आहे आणि कुटुंब नियोजन करायचे आहे.

Kangana Ranaut : कंगनाला मिळाला नवा पार्टनर? लग्न अन् मुलांच्या प्लॅनिंगबाबत स्वत: केला खुलासा

मी स्वत:ला पाच वर्षांनंतर एक आई, एक पत्नी आणि सक्रियपणे काम करणारी एक माणूस म्हणून पाहते. याशिवाय नवीन भारताच्या स्वप्नात सक्रिय सहभाग घेणारी व्यक्ती म्हणून पाहते.''

Kangana Ranaut : कंगनाला मिळाला नवा पार्टनर? लग्न अन् मुलांच्या प्लॅनिंगबाबत स्वत: केला खुलासा

कंगनाचे उत्तर ऐकून, जेव्हा तिला विचारण्यात आले की ती कोणाशी लग्न करणार आहे, तेव्हा अभिनेत्रीने हे गुपित ठेवणे योग्य समजले आणि खूप शांतपणे आणि हसत उत्तर दिले की लवकरच सर्वांना याबद्दल कळेल. आपल्या आयुष्यात कोणीतरी आहे असा इशारा तिने दिला.

Kangana Ranaut : कंगनाला मिळाला नवा पार्टनर? लग्न अन् मुलांच्या प्लॅनिंगबाबत स्वत: केला खुलासा

गेल्या वर्षी 2020 मध्ये 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने लग्न आणि मुलांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. कंगना सध्या अविवाहित असली तरी वयाच्या 20 व्या वर्षापासून ती विवाहित जीवनाचे स्वप्न पाहत आहे.

Kangana Ranaut : कंगनाला मिळाला नवा पार्टनर? लग्न अन् मुलांच्या प्लॅनिंगबाबत स्वत: केला खुलासा

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना राणौतला काही दिवसांपूर्वी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगना राणौतला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान कंगना राणौतने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत तिने ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावले. तसेच तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभार मानले.