महागड्या कोल्हापुरी चपला पावसाळ्यात खराब होतात? ७ टिप्स - बुरशी न लागता टिकतील नव्यासारख्या कायम...
Updated:July 15, 2025 19:45 IST2025-07-13T00:50:52+5:302025-07-15T19:45:41+5:30
How to take care of your Kolhapuri chappal in monsoon : 7 Tips to Maintain Kolhapuri Chappals During Monsoon Season : How to care for Kolhapuri Chappals and Juttis : How to Clean Kolhapuri Chappal Easy Steps & Care Tips : How to take care of Kolhapuri Chappals : कोल्हापुरी चपलांना पावसाळ्यात बुरशीपासून वाचवण्यासाठी उपयुक्त टिप्स...

आपल्यापैकी अनेकजणींकडे हमखास किमान एक तरी महागामोलाची (How to take care of your Kolhapuri chappal in monsoon) कोल्हापुरी चप्पल असतेच. ही कोल्हापुरी चप्पल आपण मोठ्या हौसेने वापरतो. परंतु या कोल्हापुरी चपलेची पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाच्या दमट हवामानामुळे कोल्हापुरी चपलांना बुरशी लागू शकते, त्यांना कुबट खराब दुर्गंधी येऊ लागते आणि त्वचासुद्धा खराब होऊ शकते.
महागड्या कोल्हापुरी चपलांना पावसाळ्यात बुरशीपासून वाचवण्यासाठी (7 Tips to Maintain Kolhapuri Chappals During Monsoon Season) उपयुक्त टिप्स पाहूयात (How to Clean Kolhapuri Chappal Easy Steps & Care Tips).
१. पाण्यापासून दूर ठेवा :-
कोल्हापुरी चपला पूर्णपणे चामड्यापासून तयार केलेल्या असल्यामुळे पाणी लागल्यास त्या लगेच खराब होतात. पावसात भिजल्यास त्वरित कोरड्या कापडाने पुसून टाका. यापेक्षा सर्वात उत्तम उपाय म्हणजे पावसाळ्यात शक्यतो कोल्हापुरी चप्पल वापरणे टाळा.
२. पूर्ण वाळू द्या :-
चपला थोड्याही ओलसर अवस्थेत ठेवल्या, तर त्यांना बुरशी लागू शकते. यासाठी चपला वापरल्यानंतर किंवा ओल्या झाल्यावर सावलीत, किंवा हवेशीर ठिकाणी ठेवून संपूर्णपणे वाळवून घ्या. याचबरोबर, थेट उन्हात ठेवू नका त्यामुळे कातडं सुकून तडे जातात आणि चपला खराब होतात.
३. कापड्याच्या पिशवीत ठेवा :-
कोल्हापुरी चपला नेहमी ठेवताना कापसाच्या किंवा सूती कापडाच्या पिशवीत ठेवा. प्लॅस्टिक बॅगेत आर्द्रता वाढते आणि बुरशी लागण्याची शक्यता वाढते. यासाठीच चुकूनही कोल्हापुरी चपला प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवू नये.
४. सिलिका जेल किंवा कापडात मीठ ठेवा :-
आपण ज्या कपाटात चपला ठेवणार असाल, तिथे सिलिका जेल पॅकेट्स किंवा कापडात बांधलेल्या मिठाची पुरचुंडी ठेवा. यामुळे ओलसरपणा शोषून घेतला जातो आणि बुरशीपासून चपलांचे संरक्षण होते.
५. हवेशीर ठिकाणी ठेवा :-
दर २ ते ३ दिवसांनी कोल्हापुरी चपला कपाटांतून काढून थोडावेळ मोकळ्या हवेत ठेवा. त्यामुळे वासही येत नाही आणि बुरशी वाढण्याची शक्यता कमी होते.
६. बुरशी दिसल्यास लगेच साफ करा :-
जर कोल्हापुरी चपलांवर बुरशी दिसलीच, तर ती सुती कापडाने किंवा ब्रशने झटकून टाका. नंतर अँटी-फंगल पावडर, लेदर मॉइश्चरायझर किंवा वॉटर रिपेलंट लावून ठेवू शकता.
७. चपलांना तेल लावू नका :-
काहीजण चपला चांगल्या टिकण्यासाठी त्याला थोडे तेल लावतात, परंतु पावसाळ्यात हे टाळा. तेलामुळे ओलसरपणा वाढतो आणि चपलांवर बुरशी लवकर तयार होते.