Join us

पावसाळ्यात कांदे-बटाटे लवकर सडतात-हिरवे कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे-बटाटे टिकतील महिनाभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2025 08:36 IST

1 / 7
भारतीय जेवण हे कांदा-बटाट्याशिवाय अपूर्ण आहे. हे पदार्थांची चव दुप्पट पटीने वाढवतात. पावसाळ्यात अनेकदा आपण जास्तीचे कांदे- बटाटे घरात भरून ठेवतो. पण हे उबदार ठिकाणी ठेवल्यास लवकर खराब होतात.(Potato storage)
2 / 7
काही दिवसांत कांदे- बटाट्यांना मोड येऊ लागतात. काही वेळेस बटाटे मऊ पडतात. ज्यामुळे त्याचा वापर करता येत नाही. आपण देखील या समस्यांनी त्रस्त असू तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (Natural methods to increase shelf life of onions and potatoes)
3 / 7
बटाटे कधीही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवू नका. नाहीतर ते कुजून लवकर खराब होतील. साठवण्यासाठी कागदी किंवा ज्यूटच्या पिशव्या वापराव्यात.
4 / 7
सुकलेल्या कडुलिंबाची पाने कांदे- बटाट्यांमध्ये ठेवल्याने त्यांना बुरशी लागत नाही व अधिक काळ टिकतात.
5 / 7
बटाटे नेहमी अंधारात ठेवा. जास्त प्रकाशात ठेवल्याने त्यांना कोंब फुटते. तसेच त्यांना आर्द्रतेपासून वाचवणं देखील महत्त्वाचे आहे. यावर बुरशी लागली तर तो भाग कापून फेकून द्यावा, आरोग्यासाठी तो हानिकारक असतो.
6 / 7
कांदे आणि बटाटे वेगवेगळ्या पद्धतीने साठवा. भाज्यांमधून निघणारा इथिलीन वायू बटाट्यांच्या वाढीला गती देतो. कुजलेले बटाटे वेगळे ठेवा.
7 / 7
काही लोक कांदे-बटाटे साठवण्यासाठी फ्रीजचा वापर करतात. पण यामध्ये ते लवकर मऊ पडतात. फ्रीजच्या ओलाव्यामुळे लवकर खराब होतात.
टॅग्स : सोशल व्हायरलअन्नकिचन टिप्स