1 / 9जेवणात मिरचीशिवाय पदार्थाला चव येत नाही. अगदी फोडणी देण्यापासून ते पदार्थ झणझणीत करण्यासाठी हिरवी मिरची लागते. भाजी, डाळ किंवा चटणी बनवायची असेल तर मिरचीचा वापर केला जातो. (Keep green chilies fresh for long)2 / 9आपल्यापैकी अनेक गृहिणी आठवड्याभराचे सामान एकदाच आणतात. भाजीपाल साठवताना आपण अधिक काळजी घेतो. परंतु, हिरव्या मिरच्या आठवड्याभरात खराब होतात. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही त्या सडतात किंवा सुकतात. ज्यामुळे आपण त्या फेकून देतो. (Kitchen hack to store green chilies)3 / 9जर आपल्यालाही हिरव्या मिरच्या साठवायच्या असतील तर या ६ सोप्या टिप्स कायम लक्षात ठेवा. (Cooking tips for storing green chilies)4 / 9हिरव्या मिरच्यांमध्ये नैसर्गिक ओलावा असतो. जर या योग्य पद्धतीने साठवल्या नाही तर ते कुजतात. प्लास्टिकच्या पिशवीत किंवा फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांना बुरशी लागते. बंद डब्यात ओली मिरची ठेवल्याने बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे त्या लवकर खराब होतात. 5 / 9मिरच्या खरेदी केल्यानंतर त्या पाण्याने स्वच्छ धुवा. कापडावर पसरवून कोरडे होऊ द्या. त्याला ओलाव्या गेल्यानंतर साठवा. 6 / 9मिरचीचे देठ काढून मगच साठवा. यामुळे मिरची अधिक काळ टिकते आणि लवकर खराब देखील होत नाही. 7 / 9मिरच्या साठवण्यासाठी प्लास्टिकच्या डब्याऐवजी स्टील किंवा काचेच्या डब्याचा वापर करा. ज्यामुळे मिरच्या अधिक काळ टिकतील. 8 / 9मिरच्या हवाबंद डब्यात ठेवत असाल तर त्याच्या तळाशी स्वच्छ टिश्यू पेपर ठेवा. ज्यामुळे त्यातील ओलावा शोषून घेतला जाईल आणि मिरच्या फ्रेश राहातील. 9 / 9रेफ्रिजरेटरच्या तळाशी ज्या ठिकाणी आपण भाज्या ठेवतो त्या ठिकाणी मिरच्या ठेवा. जिथे तापमान स्थिर आणि थंड असेल. ज्यामुळे मिरच्या जास्त दिवस राहातील.