1 / 7सध्या इराण- अमेरिकेच्या युद्धामुळे भारतात गॅस सिलेंडरच्या तुटवडा जाणवत आहे. अशातच गॅस सिलेंडर २१ दिवसांनंतर मिळणार असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या जवळपास प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. अनेक घरांमध्ये महिना संपण्याआधीच सिलिंडर संपतो आणि पुन्हा नवीन सिलिंडरची ऑर्डर द्यावी लागते. पण गॅस इतक्या लवकर का संपतो? (Gas cylinder lavkar sampu naye mhanun upay)2 / 7कधी गॅसच्या चुकीच्या वापरामुळे, तर कधी स्वयंपाकाच्या चुकीच्या पद्धतींमुळे आपला गॅस विनाकारण वाया जात असतो. जर आपण स्वयंपाकाच्या काही साध्या आणि स्मार्ट सवयींमध्ये थोडे बदल केले, तर आपण महिन्याभरासाठी १५ ते २० दिवसांचा गॅस सहज वाचवू शकतो.जाणून घेऊया गॅसची बचत करून तुमचा सिलिंडर १५-२० दिवस कसा एक्स्ट्रा टिकवायचा. (Swayampak karnyachi sopi padhat)3 / 7आपण जर योग्य स्वयंपाकाची भांडी निवडली तर गॅसची बचत होते. नेहमी सपाट तळ असणारी भांडी निवडा. ही भांडी बर्नरवर घट्ट बसतात ज्यामुळे भांडे लवकर गरम होते. तसेच अन्न लवकर शिजण्यास मदत होते. यामुळे गॅसही कमी प्रमाणात वापरला जातो. 4 / 7डाळी, कडधान्ये किंवा तांदूळ शिजवण्यापूर्वी किमान १ ते २ तास पाण्यात भिजवून ठेवा. भिजवल्यामुळे ते पदार्थ लवकर शिजतात. जेवण बनवण्यापूर्वी सर्व तयारी करा. कांदा-लसूण चिरणे, मसाले काढून ठेवा. म्हणजे गॅस पेटवल्यानंतर तो विनाकारण सुरू राहणार नाही.5 / 7बर्नरमध्ये कचरा अडकला असल्यास फ्लेम पिवळी पडते आणि गॅस व्यवस्थित जळत नाही. ज्यामुळे त्याचा जास्त प्रमाणात वापर होतो. महिन्यातून एकदा टूथब्रश किंवा पिनाच्या साहाय्याने बर्नरची छिद्रे स्वच्छ करा. ब्लू फ्लेम ही गॅस बचतीची पहिली पायरी आहे.6 / 7भाज्या किंवा पदार्थ शिजवताना पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करा. जास्त पाणी गरम होण्यासाठी किंवा आटण्यासाठी जास्त वेळ घेते, यामुळे गॅस वाया जातो. जेवणात नेहमी मोजके पाणी वापरा. ज्यामुळे स्वयंपाक झटपट होईल. 7 / 7फास्ट गॅसवर लवकर स्वयंपाक होते असं अनेकदा आपल्याला वाटतं. पण फास्ट गॅसमुळे भांड्याच्या बाजूने उष्णता वाया जाते. कोणताही पदार्थ शिजवताना नेहमी पातेल्यावर किंवा कढईवर योग्य मापाचे झाकण ठेवा. झाकण ठेवल्यामुळे उष्णता बाहेर जात नाही. कुकरच्या शिट्ट्या मोजून घेतल्यास गॅस वाचतो.