Join us

काळी पडून घाण झालेली चहाची गाळणी १५ मिनिटांत होईल चकाचक, घ्या सोपा घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2025 09:20 IST

1 / 5
बऱ्याचदा असं होतं की चहाची गाळणी रोज वापरून वापरून अतिशय घाण होऊन जाते. आपण ती नेहमीच स्वच्छ धुतो. पण ती स्वच्छता कुठेतरी कमी पडते आणि चहा गाळणी अगदी कळकट होऊन जाते.
2 / 5
गाळणीच्या छिद्रांमध्ये चहा पावडरचे बारीक कण अडकून पडतात आणि काही दिवसांपुर्वी शुभ्र पांढरी असणारी गाळणी अगदी काळी होऊन जाते.
3 / 5
आता अशी गाळणी स्वच्छ करण्यासाठी कोणता सोपा उपाय करता येऊ शकतो ते पाहूया. यासाठी सगळ्यात आधी गाळणी गॅसवर ठेवा आणि एखाद्या मिनिटासाठी ती गरम करून घ्या. हा उपाय फक्त स्टीलच्या गाळण्यांसाठीच आहे.
4 / 5
यानंतर ती गाळणी थोडी थंड होऊ द्या. नंतर जमिनीवर आपटून तिच्यातली अडकलेली घाण काढून टाकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर टुथब्रश घेऊन तो गाळणीवर घासा. जेणेकरून बारीक छिद्रांमध्ये अडकलेली घाण निघून जाईल.
5 / 5
आता एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला. या पाण्यात गाळणी काही वेळ भिजवून ठेवा. त्यानंतर पुन्हा एकदा ती ब्रशने घासून घ्या. गाळणी अगदी स्वच्छ निघेल.
टॅग्स : स्वच्छता टिप्सहोम रेमेडीकिचन टिप्स