Join us
Daily Top 2 Weekly Top 5

घरात पालींचा सुळसुळाट असेल तर 'हे' पदार्थ कोपऱ्यात ठेवा, पाली जातील घराबाहेर कायमच्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:24 IST

1 / 7
घरातून पालींना पळवून लावण्यासाठी तुम्ही काही नेसर्गीक आणि स्वयंपाकघरातील प्रभावी उपाय करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसांत बऱ्याच ठिकाणी पाली दिसायला सुरूवात होते. पालींना पळवून कसं लावायचं हा मोठा प्रश्न सर्वांना पडलेला असतो. (What Kills Lizards Naturally)
2 / 7
कांदा आणि लसणामध्ये असलेला उग्र वास पालींना सहन होत नाही. घराच्या कोपऱ्याच्या किंवा खिडकीत यांच्या पाकळ्या ठेवल्यास पाली लांब राहतात.(How To Permanently Get Rid Of Lizards)
3 / 7
पाणी आणि काळी मिरी पावडर यांचे मिश्रण करून एक स्प्रे तयार करा. जिथे पालींचा वावर जास्त असतो तिथे हा स्प्रे मारल्यास शरीराला जळजळ होते आणि पाली पळून जातात. (How To Remove Lizards Naturally 6 Home Remedies)
4 / 7
कॉफी पावडर आणि तंबाखूच्या गोळ्या एकत्र करून पालींच्या वाटेत ठेवा. हे मिश्रण पालींसाठी विषारी असते.
5 / 7
पालींना पुदिन्याचा तीव्र वास अजिबात आवडत नाही. तुम्ही पुदिन्याचे तेल पाण्यात मिसळून याचा स्प्रे घराच्या कोपऱ्यांत मारू शकता किंवा पुदिन्याची ताजी पानं खिडक्यांजवळ ठेवू शकता.
6 / 7
काळ्या मिरीप्रमाणाचे पाण्यात तिखट मिसळून त्याचा स्प्रे तयार करा. हा स्प्रे भिंतींच्या भेगांवर किंवा कपाटाच्या मागे मारल्यास पाली त्या ठिकाणी येत नाहीत.
7 / 7
पालींना उबदार वातावरण आवडते अचानक त्यांच्यावर थंड पाणी शिंपडल्यास त्या काही काळ हालचाल करू शकत नाहीत ज्यामुळे त्यांना पकडून बाहेर काढणं सोपं जातं.
टॅग्स : होम रेमेडीस्वच्छता टिप्सप्राणीसमर स्पेशल