1 / 7उन्हाळ्याच्या दिवसांत घरात पाली येण्याचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे भितींवर तसंच किचनमध्ये पालीच पाली दिसायला सुरूवात होते. भितीं, स्वयंपाकघर, खिडक्यांच्या आजूबाजूला पाली फिरताना दिसून येतात. (How To Remove Lizards From Home)2 / 7पालींना पळवण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. कोणतेही महागडे केमिकल्स किंवा पेस्ट कंट्रोल करण्याची गरज नाही. काही सोपे उपाय तुमचं काम सोपं करतील. (Homemade Spray For Lizards)3 / 7 एक्सपर्ट्स सांगतात की तीव्र वास पालींना अजिबात आवडत नाही. या वस्तूंचा वापर करून तुम्ही एक सोपा स्प्रे बनवू शकता. 4 / 7हा स्प्रे तयार करण्यासाठी तुम्हाला व्हाईट व्हिनेगर, लिंबाचा रस, पेपरमिंट तेल आणि काळी मिरी यांसारख्या वस्तूंची आवश्यकता असेल. हे सर्व पदार्थ तुम्हाला किचनमध्ये सहज मिळतील. ज्यामुळे पालींना पळवणं सोपं होईल.5 / 7एका स्प्रे बॉटलमध्ये जवळपास १ कप पाणी घ्या. त्यात २ ते ३ चमचे व्हाईट व्हिनेगर मिसळा. नंतर लिंबाचा रस घाला आणि काही थेंब पेपरमिंट तेल मिसळा. पेपरमिंट तेल नसेल तर काळी मिरी पावडरसुद्धा वापरू शकता. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.6 / 7ज्या ठिकाणी पाली जास्त येतात अशा ठिकाणी स्प्रे करा. खिडकी, स्वयंपाकघर, दरवाजे अशा ठिकाणी शिंपडा. ज्यामुळे पाली येणार नाहीत. खाण्यापिण्याच्या पदार्थांवर थेट स्प्रे करू नका.7 / 7पालींपासून सुटका मिळवण्यासाठी घराची साफ-सफाई करणं खूपच गरजेचं आहे. पाली अशा ठिकाणी जास्त येतात जिथे कीटक असतात. रात्रभर अन्नपदार्थ उघडे ठेवल्यामुळे, खरकटं ठेवल्यामुळे पाली जास्त प्रमाणात येतात.