1 / 9फ्रिजरमध्ये साचलेला बर्फ साफ करणे म्हणजे मोठे कठीण (how to clean ice from freezer quickly) आणि किचकट काम. आपल्यापैकी बऱ्याचजणांनी फ्रिजरमध्ये साचलेल्या बर्फाला साफ करण्याचा अनुभव कधी ना कधी घेतलाच असेल. 2 / 9 फ्रिजरमध्ये साचलेला बर्फ केवळ जागा अडवत नाही, तर त्यामुळे फ्रीजची (home remedy to remove freezer ice) कार्यक्षमता कमी होते आणि वीजही अधिक खर्च होते. जर वेळोवेळी साफसफाई केली गेली नाही, तर फ्रीजरमधील वस्तू योग्य तापमानात राहत नाहीत.3 / 9पण काळजी करू नका! काही सोप्या घरगुती ट्रिक्सच्या मदतीने (how to remove freezer ice instantly) तुम्ही सहजपणे हा फ्रिजरमध्ये साचलेला बर्फ काढू शकता. 4 / 9फ्रीजरमधला बर्फ वितळवण्यासाठी तुम्ही फ्रीज बंद करू शकता. फ्रीज अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी पाणी पडल्यावर त्रास होणार नाही. नंतर एक बादली पाणी गरम करून घ्या. नंतर मगच्या मदतीनं फ्रीजरवर घाला ज्यामुळे बर्फ हळूहळू वितळेल. याचबरोबर, फ्रिजरमध्ये सहज ठेवता येईल असं एक भांडं घ्या. त्या भांडयांत उकळतं गरम पाणी भरुन घ्या आणि ते पाण्याने भरलेलं भांडं फ्रिजरमध्ये ठेवून द्या मग फ्रिजचे दार बंद करा. पाण्याच्या गरम वाफेमुळे बर्फ हळूहळू आतल्याआतच वितळू लागेल. 5 / 9फ्रिजरमधील साचलेला बर्फ़ आपण हेअर ड्रायरच्या मदतीने अगदी सहज काढू शकतो. हेअर ड्रायर हाय मोड हिटवर सेट करून घ्या. त्या नंतर फ्रिजरचे दार उघडून हेअर ड्रायर मधील गरम हवा थेट साचलेल्या बर्फावर सोडा. यातील गरम हवेमुळे बर्फ वितळू लागेल. जेव्हा तुम्ही हा बर्फ काढाल तेव्हा कोणत्याही धातूच्या चमच्याचा वापर करण्यापेक्षा लाकडी चमचा वापरावा. 6 / 9फ्रिजरमधील साचलेला बर्फ काढण्यासाठी फ्रिजरचे दरवाजे उघडे ठेवा. यामुळे वातावरणातील उष्णतेमुळे बर्फ वितळण्यास मदत होईल. रेफ्रिजररेटरखाली जाड कापड पसरवून ठेवा जेणेकरुन घरभर पाणी होणार नाही. 7 / 9जर फ्रिज योग्य तापमानावर सेट केलेला नसेल तर फ्रिजरमध्ये लगेच बर्फ साचतो. जर फ्रीजरमध्ये जास्त बर्फ जमा होत असेल तर असे समजा की, फ्रीज योग्य तापमानावर सेट केलेला नाही. फ्रीजरचे तापमान -१८ अंश सेल्सिअसवर सेट करणे आवश्यक आहे. या तापमानावर सेट न केल्यास वारंवार बर्फ जमण्याचा त्रास होऊ शकतो. 8 / 9जर फ्रीजरमध्ये कायमच नेहमीपेक्षा जास्त बर्फ जमा होत असेल तर कदाचित त्यात जास्त ओलावा टिकून राहत असेल. फ्रिजरचा दरवाजा वारंवार उघडल्यास बाहेरून ओलावा रेफ्रिजरेटरमध्ये येतो आणि बर्फ साचतो. फ्रिज वारंवार उघडल्याने आत उबदार हवा येते, जी थंड हवेमध्ये मिसळून आर्द्रता निर्माण करते आणि नंतर त्याचे बर्फात रूपांतर होते, त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच फ्रीज उघडा.9 / 9 जर तुमचा फ्रीज रिकामा असेल तर त्यात आर्द्रतेमुळे जास्त बर्फ तयार होतो. शक्य असल्यास, फ्रीज नेहमी सामानाने पॅक करून ठेवा.