Join us

कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येते? ६ सोप्या टिप्स - डोळ्यांची आग होईल कमी, कांदा रडवणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2025 18:05 IST

1 / 7
ऊन लागू नये म्हणून या ऋतूमध्ये हमखास कांदा खाल्ला जातो. कांद्यामध्ये पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्याला अधिक आरोग्यदायी ठरतात. (How to prevent teary eyes when cutting onions)
2 / 7
कांद्याचा वापर आपल्या जेवणात मोठ्या प्रमाणात केला जातो. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कांदा कोणत्या ना कोणत्या पदार्थ वापरला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. (How to cut onions without getting tears)
3 / 7
आरोग्यासाठी चांगला असणारा कांदा डोळ्यांतून मात्र पाणी काढतो. कांदा चिरताना आपल्या डोळ्यांतून अश्रू निघतात. डोळ्यांची जळजळ होते. असे जर आपल्यासोबत होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय करा. (What is the hack for onion cutting)
4 / 7
कांदा चिरण्यापूर्वी त्याचे साल काढून फ्रीजमध्ये काही मिनिटे ठेवा. त्यानंतर चिरा यामुळे डोळ्यांतून पाणी येणार नाही.
5 / 7
कांदा सोलून पाण्यात १५ ते २० मिनिटे ठेवा. यात असणारे रसायन घटक पाण्यात मिसळतात, ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होत नाही.
6 / 7
कांदा चिरण्यापूर्वी आपल्याला सुरीवर लिंबाचा रस लावायला हवा. ज्यामुळे याचा डोळ्यांवर परिणाम होणार नाही आणि डोळ्यांतून पाणी येणारं नाही.
7 / 7
कांदा चिरताना डोळ्यांतून पाणी येऊ नये असे वाटत असेल तर त्याला काही मिनिटे व्हिनेगरमध्ये ठेवा. त्यानंतर कांदा चिरा.
टॅग्स : सोशल व्हायरलकिचन टिप्स