1 / 7उन्हाळ्याच्या दिवसांत ऊन देऊन घरोघरी धान्य भरून ठेवले जाते. 2 / 7पण धान्य भरताना जर काही चुका झाल्या तर मग धान्यामध्ये किडे, अळ्या होतात. त्यावर वेळीच उपाय केले नाहीत तर सगळंच धान्य खराब होण्याची भीती असते.3 / 7बऱ्याच घरांमध्ये तांदूळामध्येही नेहमीच किडे, अळ्या होतात. असं होऊ नये म्हणून काय उपाय करावा ते पाहूया..4 / 7हा उपाय करण्यासाठी एक पेपर नॅपकिन घ्या. त्यामध्ये १ चमचा हळद घाला.5 / 7त्यामध्ये ७ ते ९ लवंगा, तेवढेच मिरे आणि चमचभर साखर घाला. आता पेपर नॅपकिनची घडी घाला, त्याला रबर लावून पॅक करून घ्या आणि ते तुमच्या तांदळाच्या डब्यात ठेवून द्या. तांदळाला किडे होणार नाहीत.6 / 7आणखी एक उपाय म्हणजे तांदळाच्या डब्यामध्ये तेजपान घालून ठेवा. तेजपानामुळेही तांदळात किडे, अळ्या होत नाहीत.7 / 7कडुलिंबाचा वाळलेला पाला धान्यामध्ये घालून ठेवल्यानेही धान्य वर्षांनुवर्षे टिकून राहाते.