Join us

पावसाळ्यात कपडे सुकल्यावरही येते कुबट दुर्गंधी? ३ ट्रिक्स- कपड्यांना येईल सुगंध...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 09:50 IST

1 / 8
पावसाळ्याची सुरुवात झाली की वातावरणातील गारवा आणि हिरवळ ( musty smell removal hacks) मनाला आनंद देते, पण त्याचबरोबर हा पावसाळा ऋतू घरात अनेक लहान-सहान समस्याही घेऊन येतो. यातीलच एक मोठी समस्या म्हणजे कपडे न सुकणे. कितीही प्रयत्न केले तरी कपडे लवकर सुकत नाहीत आणि ओलसरपणामुळे त्यांना एक कुबट, घाणेरडा वास येऊ लागतो. यामुळे कपडे पुन्हा वापरण्याची इच्छा होत नाही आणि घरातही एक प्रकारचा दमट वास पसरतो.
2 / 8
पावसाळ्यात हवेत जास्त आर्द्रता असल्यामुळे कपडे वेळेवर सुकत (How to get musty smell out of clothes during rainy season) नाहीत आणि त्यातून ओलसरपणासोबत कुबट, दुर्गंधी वास येऊ लागतो. अशा वेळी वारंवार धुतले तरीही वास पूर्णपणे जात नाही, यामुळे असे कपडे घालायला इच्छाच होत नाही.
3 / 8
या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही सोपे आणि घरच्या घरी करता (Get rid of musty odor in clothes) येणारे उपाय वापरले, तर कपडे फक्त स्वच्छच नाही तर एकदम फ्रेश आणि सुगंधी राहतील. यासाठी, नेमकं काय करायचं ते पाहूयात...
4 / 8
पावसाळ्यात ओलसर कपड्यांना येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी ३ सोपे आणि स्वस्तात मस्त असे घरगुती उपाय दिले आहेत, जे फक्त ५ मिनिटांत कपड्यांचा कुबट दुर्गंध दूर करतील. खास बाब म्हणजे हे उपाय वॉशिंग मशीनमध्येही सहज वापरता येतात, त्यामुळे तुमचा वेळ आणि मेहनत दोन्हीची बचत होईल.
5 / 8
पहिला उपाय म्हणजे लिंबाचा रस ठरतो फायदेशीर. कपडे धुतल्यानंतर एक बादली पाण्यात १ ते २ चमचे लिंबाचा रस घाला आणि त्यात कपडे स्वच्छ धुवून वाळत घाला. लिंबू हा नैसर्गिक डिओड्रंटसारखे काम करतो आणि कुबट दुर्गंधी लगेच नाहीशी करतो.
6 / 8
लिंबाच्या रसाप्रमाणेच आपण बेकिंग सोड्याचा देखील वापर करु शकतो. यासाठी, बेकिंग सोडा एक बादली पाण्यात टाकून त्यात कपडे स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर वाळत घाला. हे केवळ दुर्गंधी नाहीशी करत नाही तर कपडे मऊसूतही बनवते.
7 / 8
याशिवाय, व्हाईट व्हिनेगर हा देखील एक उत्तम पर्याय आहे. एक बादली पाण्यात एक चमचा व्हिनेगर टाकल्याने कपड्यांवरील बुरशी आणि जीवाणू नष्ट होतात, ज्यामुळे दुर्गंधी अजिबात येत नाही.
8 / 8
जर तुम्ही हे उपाय वॉशिंग मशीनमध्ये करणार असाल, तर वर सांगितलेल्या तीनपैकी कोणताही एक पदार्थ निवडा. मशीनमध्ये कपडे धुताना शेवटच्या राऊंडमध्ये एक चमचा लिंबाचा रस, एक कप बेकिंग सोडा किंवा अर्धा कप व्हाईट व्हिनेगर घाला. हा उपाय कपड्यांची कुबट दुर्गंधी घालवून कपड्यांना एकदम फ्रेश आणि सुगंधी करतो.
टॅग्स : सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सहोम रेमेडीपाऊस