कुकरची गॅस्केट सैल झाली, पदार्थ नीट शिजत नाही? ७ ट्रिक्स - मिनिटभरात सैल झालेली गॅस्केट होईल दुरुस्त...
Updated:August 29, 2025 11:05 IST2025-08-29T04:00:00+5:302025-08-29T11:05:01+5:30
how to fix loose pressure cooker rubber : fix loose pressure cooker rubber : how to tighten pressure cooker gasket : pressure cooker rubber loose solution : cooker rubber tightening hack : सैल झालेली कुकरची गॅस्केट पुन्हा नव्यासारखी घट्ट करण्यासाठी खास घरगुती ट्रिक्स...

रोजच्या स्वयंपाकात कुकरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण अनेकदा (how to fix loose pressure cooker rubber) कुकरला असणारी गॅस्केट (रिंग) सैल होते, ज्यामुळे कुकरमधून वाफ बाहेर येते ( fix loose pressure cooker rubber) आणि अन्नपदार्थ व्यवस्थित शिजत नाही. यामुळे गृहिणींना स्वयंपाक करताना खूप त्रास होतो. अशावेळी नवीन गॅस्केट विकत घेण्याऐवजी काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही (pressure cooker rubber loose solution) ती पुन्हा घट्ट करू शकता.
१. गरम पाण्यात उकळवा :-
सैल झालेली गॅस्केट एका भांड्यात पाणी घेऊन त्यात टाका. हे पाणी १०-१५ मिनिटे चांगले उकळू द्या. उकळल्यानंतर गॅस्केटला बाहेर काढून थंड होऊ द्या. यामुळे रबर पुन्हा आकुंचन पावून घट्ट होईल.
२. फ्रिजरमध्ये ठेवा :-
गॅस्केटला अर्धा ते एक तास फ्रिजरमध्ये किंवा फ्रिजरमध्ये ठेवा. फ्रिजमधील थंडगारपणामुळे रबर अधिक घट्ट होतो आणि त्याचा आकार पुन्हा पहिल्यासारखा होतो. नंतर लगेचच गॅस्केट कुकरच्या झाकणाला लावून आपण वापरु शकता.
३. तेल लावा :-
गॅस्केट खूपच कोरडी झाली असेल तर ती सैल होते. अशावेळी, गॅस्केटला थोडेसे तेल बोटाने व्यवस्थित पसरवून लावा आपण स्वयंपाक करण्यासाठी जे तेल वापरतो ते किंवा खोबरेल तेल देखील लावू शकता. यामुळे ती रबरी रिंग लवचिक बनते आणि कुकरच्या झाकणाच्या कडेला व्यवस्थित चिकटून बसते.
४. योग्य पद्धतीने झाकणात बसवा :-
गॅस्केट सैल वाटत असेल, तर ती कुकरच्या झाकणावर योग्य पद्धतीने बसली आहे की नाही हे तपासा. अनेकदा गॅस्केट चुकीच्या दिशेने लावल्यामुळे वाफ बाहेर येते. यासाठी गॅस्केट व्यवस्थित झाकणात बसवून मगच कुकर लावा.
५. स्वच्छता ठेवा :-
कुकरच्या झाकणाच्या कडेवर किंवा गॅस्केटमध्ये अडकलेली घाण तसेच साचलेला तेलाचा थर काढून टाका. गॅस्केट जर व्यवस्थित स्वच्छ केलेली असेल तर ती कुकरच्या झाकणावर अधिक जास्त घट्ट बसते.
६. सूर्यप्रकाश टाळा :-
गॅस्केट धुवून झाल्यावर थेट सूर्यप्रकाशात किंवा उष्णतेजवळ ठेवू नका. त्यामुळे ती सैल पडून लवकर खराब होते.
७. गव्हाचे पीठ लावा :-
सैल झालेली गॅस्केट पुन्हा नव्यासारखी टाईट करण्यासाठी, गॅस्केट पाण्यांत भिजवून ओली करुन घ्या त्यानंतर या गॅस्केटवर गव्हाचे पीठ भुरभुरवून लावून घ्या. मग अशी गॅस्केट कुकरच्या झाकणावर लावून घ्या. यामुळे सैल झालेली गॅस्केट व्यवस्थित कुकरच्या झाकणावर अडकून बसेल.