किचन ट्रॉली स्वच्छ करण्याचा सोपा उपाय, साबणही न लावता फक्त ५ मिनिटांत ट्रॉली-रॅक चकाचक
Updated:July 31, 2025 15:29 IST2025-07-31T15:15:26+5:302025-07-31T15:29:23+5:30

स्टीलचे रॅक, स्टीलच्या किचन ट्रॉली, किंवा भांडे ठेवण्यासाठी स्टीलचे मोठेमोठे ट्रे यापैकी एखादी वस्तू तरी आपल्या घरात असतेच.
ट्रॉली असो, रॅक असो किंवा मोठी स्टीलची जाळी असो, त्यांच्यामध्ये ओले भांडे बऱ्याचदा ठेवले जातात. भांड्यांच्या ओलसरपणामुळे मग त्या वस्तूंवर गंजल्यासारखे लालसर डाग पडलेले दिसतात.
स्वच्छता वेळच्यावेळी झाली नाही तर ते डाग पक्के होत जातात. ते काढून टाकण्यासाठी मग खूप वेळ आणि मेहनतही लागते. म्हणूनच आता हा एक सोपा उपाय पाहा.
हा उपाय करण्यासाठी तुम्हाला साबण, डिटर्जंट असं काहीही वापरण्याची गरज नाही.
फक्त ॲल्युमिनियम फॉईलचा मध्यम आकाराचा तुकडा घ्या आणि तो थोड्या पाण्यात बुडवून त्याने ट्रॉली घासा.
अगदी ५ मिनिटांत ट्रॉली, रॅक किंवा स्टीलची जाळी अगदी चकाचक होऊन जाईल. एकदा ट्राय करून पाहा.