1 / 5प्लास्टिकच्या खुर्च्या वापरायला सोप्या आणि दणकट असल्यामुळे जवळपास प्रत्येक घरातच त्या दिसतात. 2 / 5पण त्या खुर्च्या जर पिवळट किंवा पांढरट रंगाच्या असतील तर मात्र काही दिवसांत त्यांच्यावर पिवळट डाग दिसू लागतात. बऱ्याचदा तर त्या काळवंडून जातात आणि अगदी मळकट दिसू लागतात.3 / 5म्हणूनच या खुर्च्या नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा त्या पुढील पद्धतीने धुतल्या पाहिजेत.4 / 5एक वाटी पाणी आणि पाऊण वाटी व्हिनेगर एकत्र करा आणि या पाण्याने प्लास्टिकच्या खुर्च्या महिन्यातून एकदा पुसून काढा. यामुळे त्यांचा रंग कळकट दिसणार नाही. 5 / 5दुसरा उपाय म्हणजे एक वाटी गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १ चमचा मीठ आणि १ चमचा डिटर्जंट पावडर घाला. आता हे पाणी खुर्चीवर टाकून घासणीने खुर्ची घासून काढा. ती अगदी स्वच्छ होईल.