By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:53 IST
1 / 7खिडक्यांच्या आणि दरवाज्यांच्या स्लायडींग ट्रॅकमध्ये साचलेली धूळ आणि घाण काढणं थोडं कठीण असतं. कारण ती जागा खूपच अरूंद असते. ही घाण सहजपणे साफ करण्यासाठी तुम्ही सोपे उपाय करू शकता. (How To Clean Dust In Window Sliding)2 / 7सुरूवातील ट्रॅकमधील सुकी धूळ आणि कचरा व्हॅक्यूम क्लिनरनं ओढून काढून घ्या. जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनरचे अरूंद नोजल असेल तर कोपऱ्यातील धूळ काढणं सोपं होईल. (Easy Way To Clean Sliding Window Track)3 / 7 जर घाण खूपच चिकट असेल तर त्यावर थोडा बेकींग सोडा घाला आणि वरून व्हिनेगर शिंपडा. फेस तयार होऊन घाण सैल होईल. ५ ते १० मिनिटांनी जुन्या कापडानं किंवा ब्रशनं ते पुसून काढा.4 / 7एक साधा स्पंज घ्या आणि तो स्लायडींग ट्रॅकवर ठेवा. पेननं ट्रॅकच्या लोखंडी पट्ट्यांच्या खुणा स्पंजवर करा.. आता कटरनं स्पंजला खुणांनुसार कापून घ्या. यामुळे स्पंज ट्रॅकच्या आकारात फिट बसेल आणि एका फटक्यात सगळी घाण बाहेर येईल.5 / 7कधीकधी ओले कापड वापरल्यानं घाण डाग पडतात. अशावेळी कोरडी धूळ झाडण्यासाठी मऊ केसांचा पेंड ब्रश वापरा. यामुळे कोपऱ्यातील बारीक धूळ एका जागी गोळा करणं सोपं जातं नंतर ती सुती कापडानं उचलून घेऊ शकता.6 / 7जर कचरा खूपच सुका असेल आणि व्हॅक्यूम क्लिनर नसेल तर हेअर ड्रायचा वापर करून धूळ एका बाजूला उडवून घ्या. त्यानंतर ती धूळ ओल्या कापडानं पुसून घ्या.7 / 7जर कचरा खूपच सुका असेल आणि व्हॅक्यूम क्लिनर नसेल तर हेअर ड्रायचा वापर करून धूळ एका बाजूला उडवून घ्या. त्यानंतर ती धूळ ओल्या कापडानं पुसून घ्या.