Join us

न धुता पाय पुसणी स्वच्छ करण्याची खास ट्रिक; मळकट, काळी पायपुसणी दिसेल स्वच्छ, नवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:57 IST

1 / 7
घर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि बाहेरील धूळ घरात येऊ नये. यासाठी लोक पायपुसण्यांचा वापर करतात. पायपुसणे स्वच्छ नसेल तर पूर्ण घर खराब दिसू शकतं. पाय पुसणी न धुता स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.(How To Clean Doormat Without Washing)
2 / 7
पायपुसणीला बाहेर नेऊन जोरदार झटका.यामुळे त्यामध्ये अडकलेली धूळ,माती आणि केस निघून जातील,आत अडकलेला बारीक कचराही बाहेर पडेल.
3 / 7
जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लीनर असेल, तर त्याचा वापर पायपुसणी स्वच्छ करण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. पायपुसणी जमिनीवर पसरवा आणि व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छ करा.
4 / 7
पायपुसणीतील दुर्गंधी आणि वास काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा किंवा कोरड्या डिटर्जंट पावडरचा वापर करू शकता.
5 / 7
जर पायपुसणीवर काही डाग पडले असतील, तर ते काढण्यासाठी लिंबू आणि मीठाची पेस्ट वापरू शकता.
6 / 7
तुमच्या पायपुसणीला जर वास येत असेल किंवा ती खूप घाण दिसत असेल, तर कोरडा शॅम्पू किंवा कार्पेट क्लिनर वापरा.
7 / 7
जर पायपुसणीवर मातीचे किंवा चिखलाचे डाग असतील, तर तुम्ही ब्रश आणि डिटर्जंट फोम वापरून पायपुसणी स्वच्छ करू शकता.
टॅग्स : स्वच्छता टिप्सहोम रेमेडी