1 / 7स्वयंपाकघरात रोजच्या वापरामुळे तवा काळा पडणे किंवा त्यावर अन्नाचे जळकट थर साचणे ही सामान्य समस्या आहे. अनेकदा पोळ्या करताना किंवा पराठे भाजताना तेल आणि उष्णतेमुळे तव्यावर डाग तयार होतात. जे साध्या साबण किंवा लिक्विडने घासूनही निघत नाहीत. तासनतास तवा घासल्यामुळे हात तर दुखतातच, पण तव्याची चकाकीही निघून जाते. अशावेळी आपल्याला नवीन तवा घेण्याशिवाय पर्याय नसतो. (Home remedies for burnt tawa)2 / 7स्वयंपाकघरातील साध्या गोष्टींचा वापर करुन १० मिनिटांत आपण काळाकुट्ट झालेला तवा चांदीसारखा चमकवू शकतो. पाहूयात काही घरगुती उपाय. (Easy way to clean greasy tawa)3 / 7सगळ्यात आधी तवा गरम करुन त्यावर चमचाभर मीठ घाला. आता अर्धा लिंबू घेऊन ते मीठासोबत तव्यावर घासून घ्या. त्यानंतर त्यावर गरम पाणी ओता आणि ५ मिनिटे राहू द्या. ज्यामुळे डाग सहज निघतील. काथ्याने घासल्यास तवा लख्ख होईल. 4 / 7तव्यावर चमचाभर बेकिंग सोडा पसरवा आणि त्यावर थोडे व्हिनेगर घाला. बुडबुडे यायला सुरुवात होईल तेव्हा जुन्या टूथब्रश किंवा स्क्रबर घेऊन घासा. व्हिनेगरमधील अॅसिड आणि सोड्याची रासायनिक प्रक्रिया थर काढून टाकण्यास मदत करते. 5 / 7घरात असलेली जुनी एक्सपायरी झालेली टॅबलेट गोळी घ्या. तव्यावर थोडे पाणी घालून ती गोळी जळकट भागावर घासल्याने डाग निघण्यास मदत होईल. 6 / 7तव्यावर खूप जुना आणि जाड काळा थर साचला असेल तर विटेचा छोटा तुकडा घेऊन त्याने तवा घासा. खरखरीतपणामुळे जळालेला भाग लवकर निघतो. नॉन-स्टिक तव्यासाठी ही पद्धत वापरु नका, तवा खराब होईल. 7 / 7जर आपला नॉन-स्टिक तवा खराब झाला असेल, तर कधीही तारेच्या घासणीने घासू नका. त्यात पाणी आणि थोडे डिश वॉश घालून उकळवा. नंतर स्पंजने हलक्या हाताने साफ करा.