1 / 7एखादा पदार्थ करपल्यामुळे भांडं तळाशी काळं झालं असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.(how to clean burnt kadhai?)2 / 7स्वयंपाक करताना बऱ्याचदा असं होतं की गडबडीत एखादा पदार्थ करायला आपण कढई, पातेले गॅसवर ठेवतो. पण नंतर मात्र गॅस बंद करायचं पार विसरून जातो.(simple kitchen tips to clean burnt kadhai)3 / 7त्यामुळे मग भांड्यातला पदार्थ सगळा करपून जातो आणि त्यामुळे मग ते भांडं तळाशी अगदी काळपट होऊन जातं.(easy cleaning tips for burnt kadhai)4 / 7हे भांडं स्वच्छ करताना अक्षरश: नाकी नऊ येतात. कारण कितीही जोर देऊन घासलं तरी भांड्याचा काळेपणा कमी होत नाही. अशावेळी पुढे सांगितलेला एक साेपा उपाय करून पाहा.5 / 7हा उपाय करण्यासाठी जळालेल्या भांड्यामध्ये पाणी घाला. त्यामध्ये २ चमचे साखर घाला.6 / 7त्यातच बेकिंग सोडा, एका लिंबाचा रस आणि १ चमचा डिशवॉश लिक्विड घालून ते भांडे गॅसवर गरम करायला ठेवा. ७ ते ८ मिनिटे त्यातलं पाणी उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा.7 / 7भांड्यातलं पाणी कोमट झाल्यानंतर ते फेकून द्या. भांड्याच्या तळाशी जमा झालेला काळेपणा सगळा निघून गेलेला असेल. यानंतर अगदी अलगद घासून तुम्ही ते भांडं पुन्हा नव्यासारखं चकाचक करू शकता.