Join us

जादूची कांडी फिरवल्यासारखं घर क्षणात होईल स्वच्छ - पाहा १ सोपी ट्रिक, गौरीगणपतीच्या स्वागतासाठी व्हा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 19:18 IST

1 / 7
आता गौरी गणपतीचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे घरोघरी स्वच्छतेची कामं सुरू आहेत. तुम्हालाही गौरी- गणपतीच्या आगमनापुर्वी घर अगदी स्वच्छ, चकाचक करायचं असेल तर हा उपाय नक्कीच तुमच्या उपयोगी येऊ शकतो.
2 / 7
हा उपाय करण्यासाठी एका भांड्यात ग्लासभर गरम पाणी घ्या. त्यामध्ये एका लिंबाचा रस घाला.
3 / 7
यानंतर त्यामध्ये १ इनोचं पाकिट आणि १ चमचा डिशवॉश लिव्हिड घाला. आता हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा.
4 / 7
तुम्हाला जी वस्तू स्वच्छ करायची आहे त्या वस्तूवर हे पाणी शिंपडा आणि एखाद्या मिनिटाने ती वस्तू घासून घ्या. अगदी लगेचच ती वस्तू स्वच्छ झाल्यासारखी दिसेल.
5 / 7
खिडक्यांच्या काचा, आरसे स्वच्छ करण्यासाठीही हे घरी तयार केलेलं लिक्विड खूप उपयोगी ठरतं.
6 / 7
किचन ओटा, गॅस शेगडी, गॅस शेगडीच्या मागच्या बाजुला असणाऱ्या टाईल्स यांच्यावरचा चिकटपणा कमी करण्यासाठीही हे लिक्विड खूप उत्तम आहे.
7 / 7
सिंक आणि बेसिन तसेच नळांवर पडलेले बोअरवेलच्या पाण्याचे पांढरट डाग स्वच्छ करण्यासाठीही या लिक्विडचा उपयोग होतो.
टॅग्स : स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडी