भराभर लसूण सोलण्याची ही भन्नाट ट्रिक पाहिली का?- ५ मिनिटांत सोलून होईल १ किलाे लसूण
Updated:April 19, 2025 14:10 IST2025-04-19T14:06:51+5:302025-04-19T14:10:59+5:30

कोणत्याही पदार्थाची चव खुलविण्यासाठी लसूण अतिशय उपयोगी ठरतो. पण लसूण सोडण्याचं काम अनेक जणींना खूपच वेळखाऊ आणि किचकट वाटतं.
कारण एकेक पाकळी घेऊन लसूण सोलत बसायला खूप वेळ तर लागतोच. शिवाय लसूण सोलल्यानंतर हाताला लसणाचा उग्र वासही येतो.
लसूण सोलल्यानंतर तर अनेक जणींच्या हाताची जळजळ सुद्धा होते.
म्हणूनच हेच काम अगदी सोपं करण्यासाठी आणि कमीत कमी वेळात भरपूर लसूण सोलून होण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा.
हा उपाय करण्यासाठी लसूण अशा पद्धतीने मधोमध कापा आणि तो एखाद्या मिनिटासाठी थंड पाण्यात बुडवून ठेवा. यानंतर अगदी अलगदपणे लसणाची टरफलं मोकळी होतील.
जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मधोमध अर्धा कापलेला लसूण तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंदासाठी ठेवू शकता. ३० सेकंद गरम केलेल्या लसणाची टरफलंही खूप पटापट मोकळी होतात.