Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:07 IST
1 / 8हळदी कुंकवासाठी (Haldi Kumkum 2026) संस्कार भारती पद्धतीची मोठी आणि सुबक रांगोळी अतिशय देखणी दिसते. यात प्रामुख्यानं फुलं, वेल, चक्रारकार नक्षीचा वापर केला जातो. (Haldi kumkum 2026)2 / 8 या दिवशी रांगोळीमध्ये प्रामुख्यानं सुगडं, तिळगूळ आणि पतंगांचे चित्र काढले जाते जे संक्रांतीचे प्रतिक मानले जाते.3 / 8 रांगोळीच्या मध्यभागी हळद-कुंकवाचा करंडा किंवा दोन छोटी ताटं रेखातून त्यात पिवळा आणि लाल रंग भरल्यास ते अधिक उठावदार दिसतात.4 / 8साधेपणा हवा असेल तर झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचा वापर करून काढलेली रांगोळी नैसर्गिक आणि प्रसन्न वाटते.5 / 8घराच्या उंबरठ्यावर किंवा जेवणाच्या ताटाभोवती छोटी नाजूक वेल किंवा ठिपक्यांची रांगोळी काढून सण साजरा केला जातो.6 / 8या दिवशी गडद लाल, पिवळा आणि हिरवा या रंगांचा वापर केल्यास रांगोळी पारंपारीक आकर्षक दिसते. 7 / 8एकूणच रांगोळी ही केवळ सजावट नसून ती सुवासिनींचे स्वागत करण्याचे आणि मांगल्यांचे प्रतिक मानली जाते.8 / 8तुम्हाला रांगोळी काढायला फार वेळ नसेल तर रेडीमेड ठसे घेऊन सुंदर रांगोळी काढू शकता.