२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

Updated:February 2, 2026 13:21 IST2026-02-02T12:56:04+5:302026-02-02T13:21:11+5:30

Garlic Peeling Hacks : लसणाची सालं ही खूपच हलकी असतात. लसूण हलका ठेचून झाल्यानंतर त्यावर ड्रायरनं गरम गवा सोडा.

२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

लसूण सोलणं (Garlic Peeling) हे किचनमधलं सर्वात कष्टांचं आणि वेळखाऊ काम वाटतं. पण काही साध्या ट्रिक्स वापरल्या तर तुम्ही काही मिनिटांत भरपूर लसूण सोलू शकता. (How To Peel Garlic Easily Garlic Peeling Hacks)

२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

अख्खा लसूण हाताच्या तळव्यानं किंवा जड वस्तूनं जोरात दाबा.त्यामुळे मुळाकडचा भाग सैल होतो आणि पाकळ्या पटकन सुटून सालं मोकळी होतात. (Garlic Peeling Hacks)

२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

लसणाच्या पाकळ्या अर्धा तास फ्रिजरमध्ये ठेवा आणि बाहेर काढून लगेच कोमट पाण्यात घाला. तापमानातील या बदलांमुळे साल आणि लसूण यांच्यातील पकड सैल होते आणि साल कागदासारखे निघून जातात.

२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

लसणाच्या पाकळ्या एका जाड आणि खडबडीत सुती कपड्यात गुंडाळा. तो कपडा जमिनीवर ठेवून हातानं चोळा. यामुळे साल कड्याला चिकटून राहतात आणि लसूण स्वच्छ बाहेर येतो.

२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

जर तुम्ही भरपूर लसूण सोलत असाल तर पाकळ्या एका जाळीच्या टोपतील ठेवा आणि नळाच्या प्रेशरखाली हातानं चोळा. ओलेपणामुळे घर्षण वाढते आणि सालं धुतली जाऊन वेगळी होतात.

२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

लसणाची सालं ही खूपच हलकी असतात. लसूण हलका ठेचून झाल्यानंतर त्यावर ड्रायरनं गरम गवा सोडा. वजनानं हलकी असलेली सर्व सालं उडून जातील आणि फक्त सोललेला लसूण मागे राहील.

२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

बऱ्याचदा आपण सालं काढण्याचा प्रयत्न करतो. पण खरी पकड मुळाशी असते. चाकूनं लसणाच्या मुळाकडचा भाग कापून टाका आणि मग साल ओढा. ज्यामुळे सालं सहज निघतील.

२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

पाकळ्यांवर थोडं जाड मीठ घाला आणि डब्यात ठेवा. मिठाचा खरखरीतपणा स्क्रबसारखे काम करतो आणि सालं सोलून काढतो.

२ मिनिटांत सोला भरपूर लसूण! लसूण सोलण्याच्या ८ ट्रिक्स, बोटं न दुखता झरझर होईल काम

लसूण सोलण्यापूर्वी हाताला आणि लसाणाला थोडं तेल लावा. यामुळे हाताला वास येत नाही आणि हाताचं घर्षण कमी होऊन सालं हातात अडकण्याऐवजी सरसर बाजूला होतात.