Join us   

Father's Day 2022 : एकट्यानं मुलांचा सांभाळ करतात 'हे' सुपरमॅन; बॉलिवूडचे 'सिंगल फादर्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 4:24 PM

1 / 8
जिथे मुलासाठी आईचे प्रेम सर्वात मौल्यवान असते तसंच मुलं बापाच्या सावलीत सुरक्षित राहतात. वडील काहीही न बोलता आपली जबाबदारी शांतपणे पार पाडतात. (Father's Day 2022) एकट्या बापाचा विचार केला तर त्यांचे महत्त्व आणखी वाढते. कारण अशावेळी तो पुरूष मुलाला आईची काळजी देखील देतो आणि वडिलांचे कर्तव्य देखील करतो.
2 / 8
बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे आपल्या मुलांचे संगोपन एकट्याने करत आहेत. काहीजण लग्नाशिवाय वडील बनतात, तर काहीजण पत्नीने जग सोडल्यानंतर मुलाची जबाबदारी एकटेच घेत आहेत. करण जोहरपासून राहुल देवपर्यंत त्यांचा सिंगल फादरच्या यादीत समावेश आहे. (karan johar to rahul dev these are the super cool single fathers in bollywood)
3 / 8
करण जोहरनं सिंगल फादर बनून त्यांनी समाजात बदल घडवून आणला आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक-निर्माता सरोगसीतून दोन मुलांचा बाप झाला आहे. तो एकटा यश आणि रुहीची काळजी घेतो. कामासोबतच तो मुलांसोबत वेळ घालवतो. इंस्टाग्रामवर त्यांच्या मुलांसोबतचे मस्ती करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत.
4 / 8
तुषार कपूर सिंगल फादर बनून तो आपल्या मुलाचे संगोपन करत आहे. त्याचा मुलगा लक्ष्य सहा वर्षांचा असून वडीलांसोबत खूप मजा करतो आहे. अभिनेता सोशल मीडियावर आपल्या मुलासोबतचे छान फोटो शेअर करत असतो.
5 / 8
सिंगल फादरच्या यादीत राहुल देवचाही समावेश आहे. 2010 मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगामुळे निधन झाले. तेव्हापासून ते त्यांचा मुलगा सिद्धार्थला एकटेच वाढवत आहेत. सिद्धार्थ सध्या यूकेमध्ये शिकत आहे.
6 / 8
साऊथचा सुपरस्टार कमल हसन हा देखील सिंगल फादर आहे. तो त्याच्या दोन मुली श्रुती हासन आणि अक्षरा हसनची काळजी घेतो. या दोन्ही मुली मोठ्या झाल्या आहेत आणि चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. दुसरी पत्नी सारिका हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर कमलने दोन्ही मुलींचा सांभाळ केला. 2004 पासून तो आपल्या सुंदर मुलींना एकटाच वाढवत आहे.
7 / 8
'द फायर' आणि 'जोश' यांसारख्या चित्रपटांचा अभिनेता चंद्रचूर सिंग देखील सिंगल फादर आहे. त्यांचा मुलगा श्रंजय सिंग याला तो एकटाच वाढवत आहेत. चंद्रचूड सिंहने मे 1999 मध्ये अवंतिका मनकोटियाशी लग्न केले. पण दोघांचे मार्ग वेगळे झाले. लाइमलाइटपासून दूर राहणारा चंद्रचूड एकुलता एक मुलगा वाढवत आहे. त्यामुळे त्यानं इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आहे. अलीकडेच तो आर्या या वेबसिरीजमध्ये दिसला होता. एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, त्याचे मूल त्याच्यासाठी प्राधान्य आहे. त्याची काळजी घेण्यासाठी तो कामातून अधूनमधून ब्रेक घेतो.
8 / 8
राहुल बोस हे देखील सिंगल फादर आहेत. जैविक दृष्ट्या तो कोणत्याही मुलाचा बाप नाही. उलट त्यांनी सहा मुले दत्तक घेतली आहेत. तो त्यांची काळजी घेत आहे. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात. राहुल हे समाजासमोर उदाहरण आहे.
टॅग्स : सोशल व्हायरलसोशल मीडिया