Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिनाला फक्त ३ रंग वापरून काढा सुंदर छोट्या रांगोळ्या; ५ मिनिटांत घराला येईल शोभा
Updated:August 11, 2025 16:25 IST2025-08-11T13:46:57+5:302025-08-11T16:25:08+5:30
Independence Day 2025 Rangoli Designs : Tricolor Rangoli Designs

यंदा १५ ऑगस्टला (Independence Day 2025) ७९ वा स्वातंत्र्यदिन भारतभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. घरोघरी स्वातंत्र्यदिनाच्या रांगोळ्या काढल्या जातात. स्वातंत्र्यदिसाठी दारापुढे काढता येतील अशा सोप्या रांगोळ्या पाहूया. (Rangoli Designs Independence Day)
स्वातंत्र्य सैनिकांची थीम घेऊ शकता. मोठी गोल रांगोळी, मध्यभागी सैनिकांची रांगोळी काढू शकता.
नारंगी, पांढरा, हिरवा या तीन पट्ट्यांची रांगोळी काढू शकता. पांढऱ्या पट्ट्यात मधोमध अशोक चक्र निळ्या रंगात. खाली “जय हिंद” किंवा “वंदे मातरम” लिहा
अशोक चक्र” केंद्रबिंदू ठेवून बाहेरच्या रेषांत तिरंग्याचे रंग व फुलांच्या डिझाईन्स काढता येतील.
रांगोळीत भारताचा नकाशा काढू शकता. नकाशात तिरंग्याचे तीन रंग भरून बाजूला लाल किल्ला, ध्वज फडकवणारी आकृती काढा.
रंगीबेरंगी बॉर्डर आणि मध्यभागी “१५ ऑगस्ट” किंवा “जय हिंद” मोठ्या अक्षरांत लिहा. अक्षरांना तिरंग्याचे रंग भरा.
तिरंग्याच्या बाहेरील बाजूनं तुम्ही मोराचं चित्र काढू शकता.
३ रंगांचे ठिपके ठेवून त्यावर माचिसची काढी फिरवून तुम्ही ही रांगोळीसुद्धा काढू शकता.
बॅकग्राऊंडला तिरंग्याचे रंग भरून वर निळ्या रंगाचा मोर काढल्यास रांगोळी उठून दिसेल.
छोटा गोलाकार रंगवून तुम्ही बाहेरून हवीतशी डिजाईन काढून रांगोळी सजवू शकता.