1 / 12'दसरा' म्हणजे परंपरा, आनंद आणि उत्साहाचा सण. या दिवशी आपट्याची पानं सोन्यासारखी मानली जातात आणि त्यांना विशेष महत्त्व असते. या दिवशी एकमेकांना आपट्याची पाने देऊन 'सोने' वाटण्याची आपली पारंपरिक प्रथा आहे. दसरा - दिवाळी सारखे सण रांगोळी शिवाय (Dussehra Special Rangoli) अपूर्णच आहेत. 2 / 12दसऱ्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर, आकर्षक, रेखीव रांगोळ्या काढून सण साजरा करतो. रांगोळीमुळे सणाची शोभा तर वाढतेच सोबतच सजावट केल्याने घरदार, अंगण अधिक सुंदर दिसते. 3 / 12दसऱ्याच्या सणाला विशेष महत्व असणाऱ्या आपट्याच्या पानांच्या वेगवेगळ्या डिझाईन्स काढून, अनोखी आणि कलात्मक रांगोळी काढू शकता. आपट्याच्या पानांच्या सोप्या पण आकर्षक डिझाईन्स पाहूयात आणि यंदाचा दसरा अधिक खास बनवूया! 4 / 12१. मध्यभागी दिवा किंवा 'शुभ दसरा' लिहून, त्याच्याभोवती आपट्याच्या पानांचे डिझाईन काढून त्यात रांगोळीचा हिरवागार रंग भरला की, रांगोळी अधिक उठून दिसते. 5 / 12२. दसऱ्याला आपट्याच्या पानांसोबतच झेंडूच्या फुलांनाही तितकेच महत्व असते. आपण अशाप्रकारे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या, रांगोळीच्या मदतीने सुंदर अशी दसऱ्याच्या सणाला शोभेल अशी रांगोळी काढू शकता. 6 / 12३. आपट्याची खरी पाने, झेंडूची फुले, दिवा, सरस्वती, हळद - कुंकू, अक्षता यांच्या मदतीने आपण अशाप्रकारची सुंदर रांगोळी डिझाईन काढू शकता. 7 / 12४. रांगोळीने आपट्याचे पान काढून आपण त्याच्या बाजूला शोभेल अशा नथीचे सुंदर डिझाईन देखील काढून रांगोळीला अधिक आकर्षक लूक देऊ शकता.8 / 12५. रांगोळी काढण्यासाठी वेळ आणि जागा कमी असेल तर आपण अशाप्रकारे आपट्याचे छोटे पान आणि शुभ दसरा असा संदेश लिहून छोटी पण शोभिवंत दिसणारी व झटपट होणारी रांगोळी काढू शकता. 9 / 12 ६. रांगोळीच्या विविध रंगांनी, रांगोळीमध्ये आपट्याची पाने व झेंडूच्या फुलांचे डिझाईन काढून त्याभोवती दिव्यांची आरास केल्यास तुमची रांगोळी अधिक सुंदर दिसेल. 10 / 12७. रामाने रावणाचा वध केला म्हणून या सणाला 'विजयादशमी' असेही म्हणतात. याचेच प्रतीक म्हणून आपण रांगोळीत धनुष्यबाण, आपट्याची पाने, हळदी - कुंकू दाखवून देखील रांगोळी डिझाईन करु शकतो. 11 / 12८. घराच्या किंवा अंगणातील एखाद्या कोपऱ्यात अशी रांगोळी काढून देखील आपण कानाकोपऱ्याची सुंदर सजावट करु शकतो.12 / 12९. दसऱ्याच्या दिवाशी दरवाज्याला आपण झेंडूच्या फुलांचे तोरण बांधतो, या दिवशी तोरणाला देखील विशेष महत्व असते. यामुळे आपण अशा प्रकारची तोरणाच्या डिझाइन्सची देखील सुबक व रेखीव रांगोळी काढू शकतो.