Diwali 2025 : वसुबारसला पटापट काढा या खास रांगोळ्या; ८ रांगोळी डिजाईन्स, उठून दिसेल दरवाजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 16:34 IST
1 / 8दिवाळीची (Diwali 2025) सुरूवात होते ती वसुबारस (Vasubaras) सणाचे म्हणजे गोवत्स द्वादशी या सणाने. हा सण दिवाळीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. (Vasubaras Rangoli Designs)2 / 8वसुबारस हा सण प्रामुख्यानं गाय आणि वासरू यांच्या पुजनासाठी योग्य मानला जातो. या सणाचे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्वसुद्धा आहे. 3 / 8दिवाळीच्या पहिल्या दिवशी दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरासुद्धा आहे. हा दिवस गाई आणि गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. 4 / 8रांगोळीच्या मध्यभागी गाय आणि तिच्याजवळ वासरू काढले जाते. गाईच्या कपाळावर टिळा आणि गळ्यात फुलांची माळ असं तुम्ही दाखवू शकता.5 / 8पांढरा रंग गाईसाठी, हिरवा शेतीसाठी, लाल-पिवळा पूजनासाठी तसंच इतर आकर्षक रंगसुद्धा वापरले जातात.6 / 8गाय आणि लक्ष्मीचे घरात आगमन दर्शवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा तुळशी वृंदावनाजवळ गाईच्या पायांचे ठसे काढले जातात. हे ठसे विशेषत: पांढऱ्या रांगोळीनं किंवा हळदी कुंकवानं काढले जातात.7 / 8तुळशी वृंदावनाजवळ पणती, ओम, स्वास्तिक किंवा कलश यांचे डिजाईन्स काढले जातात. 8 / 8रांगोळी मुख्यतवे घराच्या दारात किंवा तुळशी वृंदावनाजवळ काढा. गाईसाठी पांढरा किंवा फिकट रंग वापरल्यास ती अधिक आकर्षक दिसते. रांगोळीत लाल, पिवळा, हिरवा आणि केशरी रंगाचा जास्त वापर करा.