Join us

फक्त २० रुपयांची 'ही' वस्तू घरी आणा- किचनपासून बाथरुमपर्यंत सगळं घर होईल स्वच्छ- चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2025 12:00 IST

1 / 7
घर रोजच्या रोज आवरलं, पुसलं तर ते स्वच्छ दिसतं. आता घर स्वच्छ ठेवणे म्हणजे फक्त झाडू फरशी करणे असं नाही. घरातला कोपरा न कोपरा जेव्हा स्वच्छ केला जातो तेव्हाच ते घर स्वच्छ आहे, असं म्हटलं जातं.
2 / 7
घर जर तुम्ही रोजच्या रोज स्वच्छ करून टापटीप ठेवलं तर स्वच्छतेचं काम खूप लवकर होतं. आता घराची स्वच्छता करण्यासाठी नेहमीच महागड्या साबण, डिशवॉश, वेगवेगळे क्लिनिंग लिक्विड वापरण्याची गरज नसते. कारण असे काही स्वस्तात मस्त मिळणारे पदार्थ आहेत ज्यांच्या वापरामुळे कमीतकमी मेहनतीत आणि कमीतकमी वेळामध्ये घर अगदी स्वच्छ होऊ शकतं.
3 / 7
त्यापैकीच एक आहे व्हिनेगर. व्हिनेगरचा उपयोग करून घरातल्या वेगवेगळ्या वस्तू कशा स्वच्छ करता येतात ते आता पाहूया.
4 / 7
व्हिनेगर आणि स्प्राईट हे दोन पदार्थ एकत्र करा आणि त्याने घरातले आरसे, खिडक्यांच्या काचा पुसून काढा. आरसे आणि काचा छान चमकतील.
5 / 7
व्हाईट व्हिनेगर आणि गरम पाणी यांच्या मिश्रणाने किचनमधले तेलकट डाग खूप लवकर स्वच्छ करता येतात.
6 / 7
किचन ओटा, सिंकमधले डाग स्वच्छ करण्यासाठी व्हाईट व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हे मिश्रण खूप उपयोगी ठरतं.
7 / 7
नळांवर बोअरवेलच्या पाण्याचे पांढरट डाग पडतात. ते स्वच्छ करण्यासाठी व्हाईट व्हिनेगर आणि टुथपेस्ट वापरता येतं. नळ अगदी नव्यासारखे चकाचक होतील.
टॅग्स : स्वच्छता टिप्सकिचन टिप्सहोम रेमेडी