Dhanteras 2025 Rangoli: धनत्रयोदशीला ५ मिनिटांत दारापुढे काढा या सुंदर रांगोळ्या; लक्ष्मी प्रसन्न राहील-भरभराट होईल
Updated:October 15, 2025 10:08 IST2025-10-15T09:56:37+5:302025-10-15T10:08:34+5:30
Dhanteras Rangoli Designs : धनत्रयोदशीच्या रांगोळीत लक्ष्मीच्या पावलांना विशेष महत्त्व आहे

दिवाळीच्या दिवसांत दारासमोर रांगोळी काढण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. दिवाळीच्या ४-५ दिवसांत तुम्ही हवी ती रांगोळी सहज काढू शकता. (Easy Rangoli For Diwali)
धनत्रयोदशीला धन आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या खास रांगोळी डिझाईन्स काढल्या जातात.
धनत्रयोदशी हा दिवाळी सणाचा पहिला आणि महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी देवी लक्ष्मीचे घरात आगमन होते
धनत्रयोदशीला धनाची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवसासाठी काही खास रांगोळ्या पाहूया.
धनत्रयोदशीच्या रांगोळीत लक्ष्मीच्या पावलांना विशेष महत्त्व आहे. ही पाऊले घराच्या आत येताना दाखवली जातात, जी संपत्ती आणि समृद्धीचे आगमन दर्शवतात.
धनत्रयोदशी ही धनाची देवता कुबेर यांना समर्पित असल्याने, काहीजण रांगोळीत धनाची पेटी (Treasure Box) किंवा कुबेर कलशाची प्रतिमा रेखाटतात.
हिरवा रंग वाढ आणि प्रगती दर्शवतो, लाल रंग उत्साह आणि शक्तीचे प्रतीक आहे, तर पिवळा रंग सोने आणि समृद्धीचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीच्या रांगोळीत या शुभ रंगांचा वापर केल्यास वातावरण आनंदी आणि उत्साही बनते.
कलश हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. रांगोळीच्या मध्यभागी सुंदर कलश आणि त्यावर नारळ (श्रीफल) रेखाटणे शुभ मानले जाते.