1 / 6घरातल्या स्विचबोर्डकडे कधी कधी दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे मग ते खूप घाण होत जातात. 2 / 6त्यांच्यावर अक्षरश: काळपट थर साचतो. हे स्विचबोर्ड कसे स्वच्छ करायचे हा प्रश्न असतोच. कारण त्यांना पाणी लागता कामा नये. 3 / 6त्यामुळेच काळे पडलेले स्विचबोर्ड अगदी १ मिनिटांत स्वच्छ करण्यासाठी हा एक सोपा उपाय पाहून घ्या. 4 / 6हा उपाय करण्यासाठी कापसाचा एक छोटासा बोळा घ्या आणि त्यावर खोबरेल तेल टाका. आता हा बोळा स्विचबोर्डवर घासा. त्यावर पडलेले चिकट, काळपट डाग लगेच निघून जातील.5 / 6यानंतर दुसरा एक कापसाचा बोळा घ्या आणि त्यावर तुमच्या घरातली कोणतीही टाल्कम पावडर टाका. आता तो कापसाचा बोळा स्विचबोर्डवर घासा. 6 / 6यामुळे बोर्ड आणखी स्वच्छ होईल आणि त्यावरचा तेलकटपणा, चिपचिपितपणाही निघून जाईल.