Join us
Daily Top 2 Weekly Top 5

फरशी पुसण्याच्या पाण्यात टाका 'हे' पदार्थ- मुंग्या, झुरळं होतील गायब आणि फरशी चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 12:35 IST

1 / 7
घरातल्या फरशा अगदी रोजच पुसाव्या लागतात. त्यात घरात जर लहान मुलं असतील तर फरशा अजूनच खराब होत जातात.
2 / 7
नेहमीच फरशी पुसण्याचे लिक्विड वापरून फरशा पुसण्यापेक्षा काही वेगवेगळे पदार्थ वापरून पाहा. यामुळे फरशांची चमक दिवसेंदिवस वाढत जाईल आणि घरात झुरळं- मुंग्याही होणार नाहीत.
3 / 7
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मीठ घालून फरशा पुसा. यामुळे घरात मुंग्या होत नाहीत. उन्हाळ्यात हा उपाय खूप फायदेशीर ठरतो. कारण या दिवसांत मुंग्या होण्याचे प्रमाण वाढते.
4 / 7
फरशीवरचे बॅक्टेरिया किंवा इतर जंतू कमी करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने फरशी पुसा. घरात लहान मुलं असतील तर अशा पद्धतीने तुरटीच्या पाण्याने फरशी पुसणे अधिक चांगले.
5 / 7
फरशा चमकदार करण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडा बेकिंग सोडा आणि थोडं डिशवॉश लिक्विड घाला.
6 / 7
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा तसेच थोडासा शाम्पू घालून फरशा पुसल्यास त्यांच्यावरचे डाग चटकन निघून जातात आणि फरशा छान स्वच्छ, सुगंधित हो
7 / 7
आठवड्यातून एकदा डेटॉलच्या पाण्यानेही फरशा पुसायला हव्या. यामुळे घर जास्त स्वच्छ होते.
टॅग्स : स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनहोम रेमेडी