Join us
Daily Top 2 Weekly Top 5

दसऱ्याला करा झेंडूच्या फुलांची आरास, सोप्या पण आकर्षक रांगोळ्यांचे १० सुंदर प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 14:23 IST

1 / 9
१. रांगोळीचे रंग वापरून तर आपण नेहमीच रांगाेळी काढतो. दसऱ्याच्या निमित्ताने मात्र बाजारात भरपूर झेंडूची फुलं आलेली असतात. या दिवसांत त्यांच्या किंमतीही तशा कमीच असतात. म्हणूनच त्याचा मनसोक्त वापर करून छान सजावट नक्कीच करता येते.
2 / 9
२. घराला तोरण लावण्यासाठी आपण झेंडूची फुलं वापरतोच. पण रांगोळीतही त्याचा नजाकतीने वापर केला तर नक्कीच घराची शोभा आणखी वाढते.
3 / 9
३. म्हणूनच या दसऱ्याला जर झेंडूच्या फुलांची रांगोळी काढण्याचा विचार असेल, तर या बघा काही सोप्या पण आकर्षक रांगोळी डिझाइन्स. यामुळे रांगोळी काढण्याच्या नक्कीच वेगवेगळ्या आयडिया मिळतील.
4 / 9
४. हे एक साधे- सोपे डिझाईन. झेंडूच्या फुलांची नुसती साध्या पद्धतीने मांडणी केली असून त्याला हिरव्या पानांची आकर्षक सजावट केली आहे. ही रांगोळी झटपट होण्यासारखी असून दिसायलाही सुरेख दिसते.
5 / 9
५. रंगांच्या रांगोळीची मजा आणि तिचे पावित्र्य तर निश्चितच वेगळे आहे. पण अशा प्रकारची फुलांची रांगोळीही सणावाराचा आनंद निश्चितच वाढवते.
6 / 9
हे देखील एक सुरेख आणि सोपं डिझाईन. झेंडूची फुलं आणि पानं यांची विशिष्ठ पद्धतीने मांडणी केली की सुंदर रांगोळी झाली तयार.
7 / 9
अशा प्रकारे पाण्याने भरलेले भांडे मध्यभागी ठेवून त्याच्या भाेवती झेंडूच्या फुलांनी छान सजावट करता येईल.
8 / 9
आजकाल एखाद्या मातीच्या मटक्यातून झेंडूच्या माळा खाली पडत आहेत, अशा प्रकारची सजावटही केली जाते. अंगणात किंवा घरात कॉर्नरपीस सजविण्यासाठी तुम्ही अशी डिझाइन करून शकता.
9 / 9
गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याभोवती झेंडूची फुलं, असं डिझाइनही अगदी छान दिसतं. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाइन घेऊ शकता.
टॅग्स : नवरात्रीरांगोळी