उन्हाळ्यात स्वयंपाक करताना किचनमध्ये फार उकडते ? ६ टिप्स, घाम आणि उकाड्यापासून सुटका...
Updated:April 7, 2025 12:14 IST2025-04-07T11:54:15+5:302025-04-07T12:14:30+5:30
Amazing Hacks To Keep Kitchen Cool In Hot Summer : Tips For Keeping the Kitchen Cool During a Heat Wave : Interesting Ways To Make Summers Easier In Kitchen : Helpful Summer Hacks for Home and Kitchen : How to Cool a Kitchen In The Summer 6 Simple Ideas : 6 Tips to Keep Your Kitchen Cool During Heat Waves : उन्हाळ्यात उकाड्याने किचनमध्ये स्वयंपाक करणे नकोसे वाटते मग या ६ टिप्स लक्षात ठेवा...

उन्हाळा म्हणजे सगळ्यांचं नकोसा वाटणारा ऋतू. यातही उन्हाळ्यात (Amazing Hacks To Keep Kitchen Cool In Hot Summer) किचनमध्ये स्वयंपाक करायचा म्हणजे गृहिणींसाठी खूप (How to Cool a Kitchen In The Summer 6 Simple Ideas) मोठा टास्कच असतो.
आधीच वातावरणातील उष्णता आणि त्यात गॅस जवळ ( 6 Tips to Keep Your Kitchen Cool During Heat Waves) उभे राहून स्वयंपाक करणे म्हणजे जीवाची काहिली होते. स्वयंपाक करेस्तोवर घामाच्या धारांनी अंग भिजून जाते. अशावेळी स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये जावेसे वाटत नाही.
उन्हाळ्यात स्वयंपाक करताना किचनमध्ये गरम होऊ नये, तसेच किचनमध्ये थंडावा मिळावा यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करुयात.
१. चिमणी आणि एक्झॉस्ट फॅन वापर करा :-
किचनमध्ये काम करत असताना चिमणी आणि एक्झॉस्ट फॅन आवर्जून लावा. जेणेकरून किचनमधील गरम वाफ बाहेर जाऊन आतील वातावरण थंड राहण्यास अधिक मदत होईल. चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅन नसेल तर किचनच्या खिडकीवर टेबल फॅन ठेवाव जेणेकरून गरम वाफ बाहेर पडण्यास मदत होईल.
२. किचनच्या खिडक्या :-
दुपारी किंवा सकाळी जेव्हा किचनमध्ये थेट सुर्यप्रकाश येत असेल तेव्हा किचनच्या खिडक्या बंद ठेवाव्यात. संध्याकाळ होताच किचनच्या खिडक्या उघडाव्यात जेणेकरून मोकळी हवा आत येईल आणि किचनमध्ये थंडावा राहील.
३. कुलिंग स्प्रे तयार करा :-
कुलिंग स्प्रे तयार करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये थंड पाणी घ्यावे. या थंड पाण्यांत पुदिन्याच्या पानांची पेस्ट, गुलाब पाणी आणि इसेन्शियल ऑईलचे ४ ते ५ थेंब घालूंन कुलिंग स्प्रे तयार करावा. हा कुलिंग स्प्रे किचनमधील ओटा, पडदा आणि भिंतींवर फवारून घ्यावा. यातील थंड पाण्याने किचनमध्ये थंडावा राहतो तसेच गुलाब पाणी आणि इसेन्शियल ऑईलच्या सुगंधाने किचनमध्ये फ्रेशनेस कायम टिकून राहतो.
४. अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करा :-
किचनमधील खिडक्यांच्या काचेवर अॅल्युमिनियम फॉईल लावावी. अॅल्युमिनियम फॉईलच्या चमकदार पृष्ठभागामुळे सूर्यप्रकाश परावर्तीत होतो,यामुळे किचनमधील वातावरण थंड ठेवण्यास मदत होते.
५. मातीच्या भांड्यांचा वापर करा :-
किचनमध्ये थंडावा राखून ठेवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करावा. मातीचा तवा, हंडी, मटके अशा भांड्यांचा वापर करावा. मातीच्या भांड्यांमध्ये नैसर्गिक ओलावा असतो त्यामुळे स्वयंपाक करताना फारसे गरम होत नाही.
६. खिडकी दरवाज्यांवर ओले कापड ठेवा :-
किचनच्या खिडक्या आणि दरवाज्यांवर ओले सुती कापड अंथरून घालावे. यामुळे बाहेरुन येणारी हवा थंड होण्यास मदत होते. इतकेच नाही तर खिडक्यांवर शक्य असल्यास चटई अंथरावी, यामुळे किचनमध्ये थंडावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.