Join us   

अंबानीच्या लेकाच्या लग्नात रिहाना करणार परफॉर्म; पण रिहाना नक्की आहे तरी कोण? तिची संपत्ती किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2024 3:01 PM

1 / 8
आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाला कोण नाही ओळखत. काही वर्षांपूर्वी तिने भारतीय शेतकऱ्यांना समर्थन दर्शवत -ट्वीट केले होते. तेव्हा प्रत्येक भारतीयांनी तिचे कौतुक केले (Rihanna). त्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली आहे, आणि कारण म्हणजे अनंत अंबानी यांचं लग्न(8 things you probably didn't know about Rihanna).
2 / 8
'रिलायन्स इंडस्ट्रीज'चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या लग्नाची चर्चा भारतात नाही जगभरात होत आहे. अंबानीच्या लग्नात जगभरातील प्रभावशाली व्यक्ती हजेरी लावतील. ज्यात आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाचा देखील समावेश आहे. पण अनेकांना रिहानाबद्दल बऱ्याच गोष्टी ठाऊक नाही. रिहाना नक्की कोण? तिची संपत्ती किती? तिची लोकप्रियता इतकी का? पाहूयात.
3 / 8
रिहाना ही कॅरेबियन पॉप गायिका आहे. रिहानाचं संपूर्ण नाव रॉबिन रिहाना फेंटी आहे. २० जानेवारी १९८८ मध्ये बार्बाडोस येथे तिचा जन्म झाला. रिहानाचे वडील बर्बाडियन होते आणि आई गयाना दक्षिण अमेरिकेच्या उत्तर अटलांटिक किनारपट्टीवरील एका देशाची रहिवाशी आहे. तिचे सोशल मीडियावर कोटीच्या घरात फॉलोअर्स आहेत.
4 / 8
वयाच्या १६ व्या वर्षी रेकॉर्ड प्रोड्यूसर इवान रोगर्स यांनी रिहानाला रेकॉर्डिंगसाठी अमेरिकेत बोलावले होते. २००५ मध्ये, रिहानाने तिचा पहिला स्टुडिओ अल्बम 'म्युझिक ऑफ द सन' रिलीज केला होता. एका वर्षाच्या आत रिहानाचा दुसरा स्टुडीओ अल्बम 'अ गर्ल लाइक मी' रिलीज झाला. हा अल्बम बिलबोर्डच्या अल्बम चार्टच्या पहिल्या पाचमध्ये पोहोचला होता. त्यानंतर तिचे अनेक गाणे देशभरात गाजले, शिवाय यशाच्या शिखरावर चढत असताना तिने कधी मागे वळून पाहिलं नाही.
5 / 8
वर्ल्ड टॉप रिचेस्ट गायकांच्या यादीत रिहानाचे नाव तिसऱ्या क्रमांकावर असून, तिची ऐकून संपत्ती $१.४ बिलीअन इतकी आहे. रिहाना फक्त संपत्तीनुसार श्रीमंत नसून, चाहत्यांकडूनही तिला प्रेम आणि आदर मिळाले. ट्विटरवर, १०० दशलक्ष फॉलोअर्स असलेल्या जगभरातल्या सेलिब्रिटींमध्ये रिहाना चौथ्या स्थानावर आहे.
6 / 8
रिहाना फक्त पॉप गायिका नसून, उत्तम अभिनेत्री देखील आहे. हॉलिवूड फिल्म बॅटलशिप आणि ओशियन ८ सारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्वाची भूमिका साकारली. रिहानाचा फॅन्टी नावाचा स्वतःचा ब्रॅण्ड देखील आहे. ज्यातून ती वर्षाला कोटींच्या घरात कमाई करते.
7 / 8
ग्लोबल स्टार रिहानाच्या नावे अनेक विक्रमे आहेत. तिला नऊ ग्रमी पुरस्कार, २३ बिलबोर्ड संगीत पुरस्कार, शिवाय तिच्या नावे एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे.
8 / 8
सध्या रिहानाने जामनगरमध्ये होणाऱ्या अनंत अंबानीच्या लग्नाला हजेरी लावली आहे. या लग्नसोहळ्यात रिहाना विशेष परफॉर्मन्स सादर करणार आहे. ती पहिल्यांदाच या शो द्वारे भारतात परफॉर्म करणार आहे. अंबानींनी रिहानाच्या शोसाठी तब्बल ५ मिलियन डॉलर्स म्हणजेच ४० कोटींच्या आसपास खर्च केला आहे. शिवाय रिहाना फक्त एक दिवस नसून, दोन ते तीन दिवस परफॉर्म करू शकते.
टॅग्स : रिहानासोशल व्हायरलसोशल मीडिया