Lemon Peel Uses : लिंबू पिळून साली कचऱ्यात टाकणं विसरा; घरातली ७ कामं झटपट होतील-झुरळं,मुंग्या होतील दूर
Updated:September 25, 2025 11:50 IST2025-09-25T11:31:13+5:302025-09-25T11:50:52+5:30
7 Ways To Use Lemon Peel At Home : लिंबाच्या सालीचा वापर केल्यास मूड चांगला राहतो. डिफ्यूजरमध्ये घालून तुम्ही घरात सुगंध पसरवू शकता.

पदार्थाला आंबटपणा येण्यासाठी तसंच चव वाढवण्यासाठी लिंबाचा आहारात समावेश केला जातो. लिंबू वापरून झाला की अनेकदा आपण साली फेकून देतो. पण लिंबाच्या सालीचा वापर तुम्ही घरातल्या बऱ्याच कामांसाठी करू शकता. ज्यामुळे घराचं वातावरण चांगलं राहतं. (Genius Ways To Make The Most Of Lemon Peels)
चव वाढवण्यासाठी
लिंबाच्या साली बारीक करून तुम्ही अनेक पदार्थांमध्ये वापरू शकता. सॅलेड,मॅरिनेशन यासाठी लिंबाच्या सालींचा वापर केला जातो. यामुळे लिंबाचा ताजेपणा आणि आंबटपणा पदार्थाला जाणवतो.
चहा किंवा डिटॉक्स ड्रिंकमध्ये
सुकलेल्या लिंबाची सालं तुम्ही हर्बल चहा किंवा डिटॉक्स ड्रिंकमध्ये घालून पिऊ शकता ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि शरीर डिटॉक्स होते.
नॅच्युरल क्लिनिंग एजंट
लिंबाचं साल एक नॅच्युरल क्लिनिंग एंजट आहे. किचन सिंक, बाथरूमची साफसफाईसाठी तुम्ही याचा वापर करू शकता ज्यामुळे दुर्गंध कमी होतो.
कँडी तयार करू शकता
लिंबाच्या साली साखरेत शिजवून तुम्ही कँडी बनवू शकता. यामुळे गोड आणि आंबट दोन्ही चवी मिळतात हे स्नॅक्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच परफेक्ट आहे.
अरोमाथेरेपी
लिंबाच्या सालीचा वापर केल्यास घरातलं वातावरण चांगलं राहतं. डिफ्यूजरमध्ये घालून तुम्ही घरात सुगंध पसरवू शकता.
पेस्ट कंट्रोल
लिंबाच्या साली कीटक आणि मुंग्या दूर करण्यास मदत करतात. किचनमध्ये ठेवल्यानं नॅच्युरल पद्धतीनं पेस्ट कंट्रोल करता येते. घरात शिरणाऱ्या झुरळांचे प्रमाण कमी होते.