फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

Updated:April 28, 2025 14:24 IST2025-04-28T14:10:06+5:302025-04-28T14:24:21+5:30

7 Salt Techniques To Keep Your Pot Water Cool In Summer : Matka Water Cooling Tips : 7 Amazing Tips to Keep Your Water Cool in an Earthen Pot : How to make matka water more cool : मिठाच्या मदतीने माठातील पाणी कसे थंडगार ठेवू शकतो ? पाहा ७ उपयोगी टिप्स...

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

बरेचजण उन्हाळ्यात मातीच्या माठातील थंडगार पाणी पिणेच पसंत (7 Amazing Tips to Keep Your Water Cool in an Earthen Pot) करतात. मातीच्या माठातील पाणी हे नैसर्गिक पद्धतीने थंडगार (7 Salt Techniques To Keep Your Pot Water Cool In Summer) ठेवले जाते, त्यामुळे उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय फायदेशीर ठरते.

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

मातीच्या माठातील पाणी दिवसभर थंडगार ठेवण्यासाठी (How to make matka water more cool) आपण अनेक घरगुती उपाय करतो. माठातील पाणी थंड ठेवण्यासाठी मिठाचा वापर केला जातो, हे आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल. परंतु कोणत्या ७ प्रकारे मिठाचा वापर करून आपण पाणी थंड ठेवू शकतो ते पाहूयात.

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

१. उन्हाळ्यात आपण थंडगार पाणी पिण्यासाठी घरात मातीचे माठ पाण्याने भरून ठेवतो. फ्रिजऐवजी आपण उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे पसंत करतो. परंतु काहीवेळा वातावरणातील उष्णता आणि उकाड्याने माठातील पाणी देखील गरम होते. अशावेळी आपण चमचाभर मिठाच्या मदतीने माठातील पाणी जास्त वेळासाठी थंडगार ठेवू शकतो.

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

२. उन्हाळ्यात मातीच्या माठातील पाणी जास्त वेळ थंडगार ठेवण्यासाठी आपण मिठाच्या पाण्यांत माठ ठेवू शकता. एका मोठ्या टबमध्ये माठ पूर्ण भिजेल इतके पाणी घेऊन त्यात मीठ घालून ते विरघळवून घ्यावे. या मिठाच्या पाण्यात माठ वापरण्यापूर्वी ५ ते ६ तास भिजत ठेवावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून यात प्यायचे पाणी भरावे. यामुळे माठातील पाणी जास्त वेळ थंड राहते.

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

२. एका मोठ्या पसरट भांड्यात वाळू आणि मीठ यांचे एकत्रित मिश्रण भांड्याच्या पृष्ठभागाशी पसरवून एक जाडसर थर करून घ्यावा. यात पाण्याने भरलेल्या माठाचा पृष्ठभाग संपूर्णपणे कव्हर होईल असा ठेवून द्यावा. वाळू आणि मिठाच्या मिश्रणाने माठाला थंडावा मिळतो, यामुळे पाणी जास्त काळ थंड राहते.

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

३. एक स्वच्छ सुती कापड मिठाच्या पाण्यातं भिजवून ते माठाभोवती गुंडाळून घ्यावे. तसेच आपण माठाच्या तोंडावर देखील आपण हे कापड झाकून ठेवू शकता. यामुळे पाणी उकाड्याने गरम होत नाही तसेच पाण्याचे तापमान योग्य पद्धतीने बॅलेन्स केल्याने ते थंडगार राहते.

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

४. माठाच्या पृष्ठाभागाभोवती जाडे मीठ पसरवून घालावे. तसेच आपण जाड्या मिठाचा थर करून त्यात माठ ठेवून देऊ शकतो. माठाच्या पृष्ठभागाशी असणाऱ्या मिठामुळे वातावरणातील जास्तीची आर्द्रता आणि उष्णता शोषून घेतली जाऊन पाणी दीर्घकाळ थंड राहते.

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

५. मातीच्या माठात पाणी भरुन ठेवण्यापूर्वी त्यात मीठ घालून सॉफ्ट स्पंजच्या मदतीने हलकेच घासून माठ आतून स्वच्छ करून घ्यावा. यामुळे माठाचा कुबट दुर्गंध येत नाही तसेच पाणी दीर्घकाळ थंड राहण्यास मदत होते.

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

६. माठात पाणी भरून ठेवल्यावर, माठाला बाहेरच्या बाजूने मीठ चोळून घ्यावे. यासाठी एका बाऊलमध्ये मीठ घेऊन त्यात किंचित पाणी घेऊन मीठ हलकेसे ओले करून घ्यावे. ही तयार मिठाची पेस्ट बाहेरच्या बाजूने माठाला चोळून घ्यावी, यामुळे पाणी दिवसभर थंड राहते.

फ्रिजपेक्षा माठातील पाणी जास्त वेळ थंडगार राहण्यासाठी, चमचाभर मीठ करेल जादू - मिठाच्या ७ भन्नाट ट्रिक्स...

७. सध्या बाजारांत मीठ वापरुन तयार केलेले मातीचे माठ देखील विकायला ठेवलेले असतात. माठ तयार करताना मातीत मीठ मिसळले जाते. यामुळे अशा पद्धतीने तयार केलेला माठ विकत आणल्यास त्यात पाणी दिर्घकाळ थंडगार राहते.