1 / 10घरातील निरूपयोगी अशा अनेक वस्तू असतात. अशा वस्तूंना आपण टाकाऊ वस्तू असे म्हणतो. 2 / 10लहानपणी शाळेत कार्यानुभवाच्या तासाला अशा वस्तूंपासून चांगल्या वापरातल्या वस्तू तयार करण्यासाठी शिक्षक शिकवायचे. टाकाऊतून टिकाऊ असे त्या प्रकल्पाचे नाव असायचे.3 / 10आजकाल शाळांमध्ये असे प्रकल्प फार चालत नाहीत. पण लहान मुलांच्या कौशल्य विकासासाठी असे प्रकल्प करणे नक्कीच गरजेचे आहे. 4 / 10रिकाम्या पाण्याच्या बाटलीपासून विविध वस्तू तुम्ही लहानपणी तयार केल्या असतील. आता तुमच्या घरातील लहान मुलांना तयार करायला शिकवा. त्यांची मज्जा आणि घरासाठी शोभेच्या वस्तू दोन्ही एकत्रच होऊन जाईल. पेनस्टॅण्डसारख्या वस्तू तयार करता येतात.5 / 10जुन्या बाटल्यांचा वापर करून बारीकसारीक रोपे लावता येतात. दिसायलाही त्या छान दिसतात. तसेच उपयोगही चांगला होतो.6 / 10रद्दी आपण विकतो किंवा जाळवणासाठी वापरतो. रद्दीच्या कागदांपासून पिशव्या देखील शिवता येतात. 7 / 10पुठ्यापासून आकर्षक असे वॉलपिस तयार करता येते. थोडी कलाकुसर करून ते आणखी सुंदर करता येते.8 / 10जुन्या साड्यांपासून पिशव्या तयार करता येतात. तसेच गोधड्या तयार करता येतात. साड्यांचा पुर्नवापर वापर तसा करा. 9 / 10जुन्या पेनांपासूनही शोभेच्या वस्तू तयार करता येतात. लहान मुलांनाही असे काही तयार करताना मज्जा येईल.10 / 10नको असलेल्या खोक्यांना आतून कागदाचा थर लावून त्याचा वापर वस्तू ठेवण्यासाठी करता येतो.