सिलेंडर घासून फरशीवर गंजाचे हट्टी डाग पडले? ६ टिप्स, मिनिटभरात नव्यासारखी लख्ख होईल फरशी...
Updated:March 27, 2025 09:33 IST2025-03-27T09:22:59+5:302025-03-27T09:33:29+5:30
6 Easy Home Remedies To Clean Gas Cylinder Rust Stains From Floor : How to remove cylinder rust stains from floor : 6 Easy Remedies To Remove Gas Cylinder Rust Stains From Tiles : फरशीवर सिलेंडर एकाच जागी ठेवून डाग पडतात, हे डाग काढण्यासाठी घरगुती सोपे उपाय...

आपल्या घरातील किचनमध्ये सिलेंडर ज्या ठिकाणी ठेवतो, त्या ठिकाणी घाणेरडे गंजाचे (6 Easy Home Remedies To Clean Gas Cylinder Rust Stains From Floor ) डाग तयार होतात. हे गंजाचे लालभडक डाग साफ करणे म्हणजे मोठे अवघड काम. फरशी पुसल्यानंतरही हे डाग सहसा निघत नाहीत. परंतु काही घरगुती उपायांच्या मदतीने गंजाचे डाग सहज निघून जातील.
१. रॉकेल :-
जमिनीवरील सिलिंडरचे डाग (How to remove cylinder rust stains from floor) काढण्यासाठी रॉकेलचा वापर करा. यासाठी १ कप पाण्यात २ ते ३ चमचे रॉकेल मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण डागांवर लावा, ५ ते १० मिनिटे हे मिश्रण डागांवर तसेच ठेवा. यानंतर, स्क्रबरच्या मदतीने फरशी स्वच्छ करा.
२. लिंबू आणि बेकिंग सोडा :-
हट्टी सिलेंडरचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करा. यासाठी १ कप पाण्यात, २ चमचे बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करा. आता हे मिश्रण टाइल्सवर टाका आणि स्क्रबरच्या मदतीने घासून घ्या. काही वेळात फरशी पूर्णपणे स्वच्छ होईल.
३. मीठ आणि व्हिनेगर :-
व्हिनेगरच्या मदतीने फरशीवरील सिलेंडरचे डाग साफ करता येईल. यासाठी एक कप व्हिनेगरमध्ये एक चमचा मीठ घालून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण फरशीवर टाका, स्क्रबरच्या मदतीने फरशी घासून घ्या. सिलेंडरचे डाग निघून जातील.
४. टूथपेस्ट :-
सिलेंडरचे डाग अथवा इतर डाग काढण्यासाठी टूथपेस्ट मदत करेल. यासाठी फरशीवरील डागांवर पेस्ट लावा. स्क्रबरच्या मदतीने डाग घासून काढा. या नंतर फरशी पाण्याने धुवा. फरशी स्वच्छ होईल.
५. बेकिंग सोडा आणि व्हिनेगर :-
गंज लागलेल्या ठिकाणी बेकिंग सोडा पावडर शिंपडा. त्यानंतर व्हाईट व्हिनेगरमध्ये कापड बुडवा. व्हिनेगरमध्ये भिजवलेल्या कपड्याने बेकिंग सोडा पावडर त्या जागेवर घासून घ्या. डाग निघाले की ओल्या कापडाने जागा पुसून स्वच्छ करा.
६. लिंबू आणि मीठ :-
एका भांड्यात लिंबाचा रस आणि मीठ मिसळा. या मिश्रणात टूथब्रश किंवा स्टील स्क्रबर बुडवा. या द्रावणाने गंज लागलेला भाग घासून घ्या. त्यानंतर गरम पाण्यात कापड भिजवा आणि मग फरशी स्वच्छ करा.